मार्कंडा देवस्थानचे काम पूर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 12:43 AM2018-03-31T00:43:26+5:302018-03-31T00:43:26+5:30
विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या मार्कंडा देवस्थानच्या कामाला जानेवारी २०१६ पासून प्रत्यक्ष सुरूवात झाली. परंतु अद्यापही या मंदिराचे काम पूर्ण झाले नाही.
ऑनलाईन लोकमत
चामोर्शी : विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या मार्कंडा देवस्थानच्या कामाला जानेवारी २०१६ पासून प्रत्यक्ष सुरूवात झाली. परंतु अद्यापही या मंदिराचे काम पूर्ण झाले नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी सहा महिन्यांत काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु सदर आश्वासन फोल ठरले, असा आरोप मार्र्कंडेश्वर देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेतून केला.
मार्र्कंडादेव मंदिराचे काम करण्याकरिता जिल्हाधिकाºयांच्या उपस्थितीत सुप्रिटेंडल आरलॉजिकल सर्वे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच देवस्थानचे पदाधिकारी यांची सभा १५ आॅक्टोबर २०१५ ला घेण्यात आली. संपूर्ण काम सहा महिन्यांत पुरातत्त्व विभागाचे म्हस्के यांच्या देखरेखेखाली जानेवारी २०१६ पासून सुरू झाले. परंतु दोन वर्षांचा कालावधी उलटूनही काम पूर्ण झाले नाही. सध्या काम थंडबस्त्यात आहे. काम लवकर मार्गी लागावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री, पुरातत्त्व विभाग, खासदार, आमदार यांना प्रत्यक्ष भेटूनही उपयोग झाला नाही. सदर मंदिराचे काम त्वरित मार्गी लावावे, अशी मागणी मार्र्कंडा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजानन भांडेकर, सहसचिव रामूजी तिवाडे, विश्वस्त रामेश्वर गायकवाड यांनी पत्रकार परिषदेतून केली.