वनव्यामुळे लागली होती आग : शंकरपूर येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 01:30 AM2018-04-16T01:30:19+5:302018-04-16T01:30:19+5:30

देसाईगंज तालुक्यातील शंकरपूर येथील इंदिरा आवास वस्तीतील विकास राऊत यांच्या घराला आग लागली. यात अर्धे घर जळून खाक झाले.

Fire broke out due to fire: Shankarpur incident | वनव्यामुळे लागली होती आग : शंकरपूर येथील घटना

वनव्यामुळे लागली होती आग : शंकरपूर येथील घटना

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
विसोरा : देसाईगंज तालुक्यातील शंकरपूर येथील इंदिरा आवास वस्तीतील विकास राऊत यांच्या घराला आग लागली. यात अर्धे घर जळून खाक झाले. आग लागल्याच्या घटनेला २० दिवसांचा कालावधी उलटत चालला असला तरी अजूनपर्यंत मदत मिळाली नाही.
शंकरपूर या मुख्य गावापासून उत्तरेला एक किमी अंतरावर इंदिरा आवास टोली आहे. या ठिकाणी २०० लोक वास्तव्यास आहेत. या वस्तीच्या एका बाजुला बोडी तर दुसऱ्या बाजुला डोंगर आहे. या टोलीवर विकास राऊत यांचे कुटुंब वास्तव्यास आहे. २२ मार्च रोजी दुपारी अचानक घराबाजुच्या झुडूपांना आग लागली. सदर आग विकास राऊत यांच्या घरापर्यंत पोहोचली व राऊत यांचे अर्धे घर जळून खाक झाले. याबाबत राऊत यांनी वन विभाग, महसूल विभाग यांच्याकडे तक्रार केली आहे. मात्र २० दिवसांचा कालावधी उलटूनही त्यांना मदत देण्यात आली नाही. वनव्यामुळे आग लागली असल्याने वन विभागाने याची दखल घेऊन मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Fire broke out due to fire: Shankarpur incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग