गॅस दरवाढीविराेधात चुल पेटवा आंदाेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:19 AM2020-12-28T04:19:24+5:302020-12-28T04:19:24+5:30
अहेरी : केंद्र शासनाने गॅसच्या दरात केलेल्या वाढीचा निषेध करीत राष्ट्रवादी महिला काॅंग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी अहेरी येथे चुल ...
अहेरी : केंद्र शासनाने गॅसच्या दरात केलेल्या वाढीचा निषेध करीत राष्ट्रवादी महिला काॅंग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी अहेरी येथे चुल पेटवा हे अनाेखे आंदाेलन केले. केंद्र शासनाने उज्ज्वला याेजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबाला गॅस कनेक्शन उपलब्ध करून दिले आहे. मात्र गॅसच्या दरामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ केली जात असल्याने गरीब कुटुंबाला गॅस सिलिंडर खरेदी करणे कठिण झाले आहेत. तसेच सर्वसामान्य व्यक्तीवरही आर्थिक बाेजा वाढत आहे. गॅस हा जीवनावश्यक वस्तूमध्ये माेडणारा घटक आहे. असे असतानाही केंद्र शासन नफ्यासाठी गॅसच्या दरामध्ये वाढ करीत आहे. याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी महिला काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी स्थानिक राजे विश्वेश्वरराव महाराज चाैकात चुल पेटवा आंदाेलन केले. आंदाेलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी महिला काॅंग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्ष तथा चंद्रपूर जिल्ह्याच्या महिला निरीक्षक शाहीन हकीम यांनी केले. विशेष म्हणजे, आंदाेलनस्थळीच चुल पेटवून त्याच ठिकाणी भाकरीसुद्धा बनविल्या. केंद्र शासनाच्या धाेरणांचा निषेध केला. जिल्हाभरात अशाप्रकारचे आंदाेलन करून केंद्र शासनाचा निषेध केला जाईल, असा संकल्प शाहीन हकीम यांनी केला.
यावेळी नगरसेविका ममता पटवर्धन, निर्मला मडावी, वैशाली गुगुल, ममता पारधी यांच्यासह अनेक महिला सहभागी झाल्या हाेत्या.