आगीत पानठेला व दुकानातील साहित्य जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 12:09 AM2019-05-30T00:09:29+5:302019-05-30T00:09:51+5:30
शहरातील जिल्हा परिषद शाळेसमोरून जाणाऱ्या मार्गावर असलेल्या पानठेला व सलुनच्या दुकानाला आग लागून या दुकानातील साहित्य जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी रात्री ३ वाजताच्या सुमारास घडली. या घटनामुळे तीन दुकानदारांचे जवळपास ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : शहरातील जिल्हा परिषद शाळेसमोरून जाणाऱ्या मार्गावर असलेल्या पानठेला व सलुनच्या दुकानाला आग लागून या दुकानातील साहित्य जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी रात्री ३ वाजताच्या सुमारास घडली. या घटनामुळे तीन दुकानदारांचे जवळपास ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
या घटनेत पानठेला व सलुन दुकानातील साहित्य दुकानासह जळून खाक झाले. नागरिकांच्या प्रयत्नामुळे आग आटोक्यात आली. यात पानठेलाचालक मारोती काळीवार यांचे २५ हजार रुपयांचे तर सलुन दुकानमालक विठ्ठल बनितवार यांचे १० हजारांचे तर सुनील जेट्टीवार यांचे पाच हजार रुपयांचे नुकसान झाले. ही आग नेमकी कशी लागली, याचे कारण कळू शकले नाही. आपद्ग्रस्तांनी घटनेची माहिती तलाठी व पोलीस ठाण्याला दिली. आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी आपद्ग्रस्त दुकानदारांनी केली आहे.