आगीत रोपवन जळून नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 01:08 AM2018-03-28T01:08:57+5:302018-03-28T01:08:57+5:30
वैरागड परिसरातील सुकाळा येथील वनविभागाच्या रोपवनाला आग लागल्याने हे रोपवन जळून नष्ट झाले. या घटनेमुळे वनविभागाचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.
ऑनलाईन लोकमत
वैरागड : वैरागड परिसरातील सुकाळा येथील वनविभागाच्या रोपवनाला आग लागल्याने हे रोपवन जळून नष्ट झाले. या घटनेमुळे वनविभागाचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. मात्र जंगलातील वनवे रोखण्यासाठी वनाधिकारी व कर्मचाऱ्यांकडून ठोस उपाययोजना होताना दिसून येत नाही. सीमावादात वनाधिकारी व कर्मचारी अडकल्याचे दिसून येत आहे.
उन्हाळ्याच्या दिवसात वनक्षेत्रास आग लागणे ही राष्ट्रीय आपत्ती म्हणून केंद्र सरकारने जाहीर केले आहे. मात्र यानंतरही जिल्ह्याच्या अनेक भागातील उभे जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी सापडत आहे. अशा परिस्थितीत वनवे लागलेला जंगल आपल्या वनक्षेत्रात येत नाही, अशी बतावणी करून वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी उघड्या डोळ्यांनी हा प्रकार पाहत आहेत.
जिल्ह्यातील वनक्षेत्रात लागणारे वनव्याचे नियंत्रण करण्यासाठी जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. मात्र वनव्याच्या नियंत्रणासाठी अधिकाºयांमध्ये समन्वय नसल्याचे दिसून येत आहे. आरमोरी वनपरिक्षेत्रातील रामाळा बिटात चार वर्षांपूर्वी लावलेले रोपवन दिवसाढवळ्या जळून खाक झाले. लाखोंची वनसंपदा नष्ट झाली. मात्र वनव्यावर नियंत्रण मिळविण्यात वनविभागाला यश आले नाही. वडसा वनविभागातील आरमोरी, कुरखेडा, देलनवाडी, पुराडा, पोर्ला आदी वनपरिक्षेत्रातील बरेचसे जंगल जळून खाक झाले. मात्र वनाधिकारी सुस्त आहेत.
वनव्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी फायरलाईनचे काम युद्धपातळीवर करण्यात आले. पण या फायरलाईनचा वनवे नियंत्रणासाठी काहीच उपयोग झाला नाही. वनाधिकारी मार्च समाप्तीचे बिल काढण्यात व्यस्त आहेत.