येरकड येथे धानाच्या पुंजण्याला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 12:41 AM2018-11-12T00:41:11+5:302018-11-12T00:41:59+5:30

तालुक्यातील येरकड येथील धानाच्या पुंजण्याला आग लागल्याची घटना ९ नोव्हेंबर रोजी घडली. विलास शिम्पी यांनी धानाची कापणी केल्यानंतर पुंजने लावले होते. जवळपास एक हजार धानाचे भारे होते. शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास पुंजण्याला आग लागली.

A fire in the clutter of the arch at Yercaad | येरकड येथे धानाच्या पुंजण्याला आग

येरकड येथे धानाच्या पुंजण्याला आग

googlenewsNext
ठळक मुद्देसव्वा लाखांचे नुकसान : अज्ञात व्यक्तीचे कृत्य

लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : तालुक्यातील येरकड येथील धानाच्या पुंजण्याला आग लागल्याची घटना ९ नोव्हेंबर रोजी घडली.
विलास शिम्पी यांनी धानाची कापणी केल्यानंतर पुंजने लावले होते. जवळपास एक हजार धानाचे भारे होते. शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास पुंजण्याला आग लागली. बाजूच्या शेतात काम करीत असलेल्या शेतकऱ्यांच्या ही बाब लक्षात येताच पुंजण्याकडे धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने रौद्ररूप धारण केले असल्याने आग आटोक्यात आले नाही. तिनही पुंजने जळून खाक झाले. याबाबतची माहिती तलाठी ए.एम.टेंभूर्णे यांना देण्यात आली. त्यांनी पंचनामा केला. यामध्ये देवनाथ शिम्पी यांचे ४० हजार रूपयांचे तर विलास शिम्पी यांचे ८० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.
अंकिसा चेक येथील घराला आग
अंकिसा : सिरोंचा तालुक्यातील अंकिसा चेक येथील तेरकरी रामक्का राजन्ना यांच्या घराला रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत घरातील वस्तू जळून खाक झाल्या. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. तेरकरी यांच्या घरावर गवत टाकण्यात आले होते. तसेच बाजूला ताडाच्या फांद्या लावण्यात आल्या होत्या. रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. गावकºयांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बाजूच्या घराला आग लागली नाही. या आगीमध्ये जवळपास पाच हजार रूपयांचे नुकसान झाले.

Web Title: A fire in the clutter of the arch at Yercaad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग