आगीमुळे वीज यंत्रणेला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 01:44 AM2018-05-12T01:44:24+5:302018-05-12T01:44:24+5:30

वीज वाहिण्या, वितरण रोहित्र, फीडर पीलर किंवा वितरण पेट्यांजवळ कचरा जाळण्याच्या प्रकारामूळे वीजयंत्रणेला धोका निर्माण होऊन सर्वसामान्य नागरिकांसोबतच विज वितरण कंपनीलाही नाहक मन:स्ताप सहन करावा लागत आहे.

 Fire power risks due to fire | आगीमुळे वीज यंत्रणेला धोका

आगीमुळे वीज यंत्रणेला धोका

googlenewsNext
ठळक मुद्देवीज पुरवठा होतो खंडीत : उपकरणांजवळ आग न लावण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : वीज वाहिण्या, वितरण रोहित्र, फीडर पीलर किंवा वितरण पेट्यांजवळ कचरा जाळण्याच्या प्रकारामूळे वीजयंत्रणेला धोका निर्माण होऊन सर्वसामान्य नागरिकांसोबतच विज वितरण कंपनीलाही नाहक मन:स्ताप सहन करावा लागत आहे. यामुळे वीज यंत्रणेजवळ कचरा टाकू नये आणि त्यास जाळूही नये असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.
शहरी व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीज वाहिण्या, फिडर पीलर, वितरण रोहित्र, वितरण पेटी किंवा डीपी अशा वीज यंत्रणेजवळील उघड्यावर असलेल्या जागेत कचरा टाकण्यात येतो. वीज यंत्रणेजवळ साठवलेला हा कचरा पेटविल्याने किंवा इतर कारणामुळे कचरा जळाल्याने विजेच्या वीज यंत्रणा आगीमुळे नादुरुस्त झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पयार्याने संबंधीत परिसरातील वीजपुरवठाही खंडित झालेला आहे. सध्या तापमानातही वाढ झाली असल्याने कचऱ्यास आग लागण्याचे प्रकारही वाढत आहेत.
वीज यंत्रणा उन्हामुळे तापलेली असल्याने अशातच वीजवितरण यंत्रणेजवळचे तापमान आगीमुळे वाढल्यास यंत्रणेलाही त्याचा फटका बसतो. वीज वाहिण्याखाली असलेल्या कचºयाचे ढीग पेटल्यामुळे किंवा त्याला आग लागल्यामुळे वीजतारा वितळून वीज खंडित होण्याचा धोका अधिक आहे. शहरातील तसेच जिल्ह्यातील नागरिकांनी उघड्यावर असलेल्या वीजयंत्रणेला धोका निर्माण होईल अशा ठिकाणी कचरा टाकू नये किंवा साठवलेला कचरा जाळू नये.
अशा प्रकारच्या घटना घडून वीज ग्राहकांना विनाकारण त्रास होऊ नये यासाठी महावितरणने सहकार्य करण्याची विनंती नागरिकांना केली आहे. वीजयंत्रणेला आग लागल्याचे आढळल्यास १९१२ किंवा १८००-२३३-३४३५ किंवा १८००-१०२-३४३५ या टोल फ्री क्रमांकावर तसेच ७८७५७६११९५ या नियंत्रण कक्षाच्या क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल यांनी केले आहे.
वीज तारा वितळण्याचा धोका
वाढलेल्या तापमानामुळे अगोदरच वीज तारांचे तापमान प्रचंड प्रमाणात वाढले राहते. अशातच आग लावल्यास आणखी वीज तारेचे तापमान वाढून वीज पुरवठा खंडीत होतो. रोहित्रापर्यंत आग पोहोचल्यास रोहित्र जळण्याची शक्यता असते. त्यामुळे विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे.
 

Web Title:  Fire power risks due to fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज