अनेक गावांमध्ये दारुमुक्त निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:33 AM2021-01-18T04:33:53+5:302021-01-18T04:33:53+5:30
गडचिरोली : लोकसभा व विधानसभा निवडणुकीप्रमाणेच ग्रामपंचायत निवडणूक सुद्धा दारूमुक्त करण्यासाठी मुक्तिपथ, गाव संघटना व जनतेच्या सहकार्याने ‘ग्रामपंचायत निवडणूक-दारूमुक्त ...
गडचिरोली : लोकसभा व विधानसभा निवडणुकीप्रमाणेच ग्रामपंचायत निवडणूक सुद्धा दारूमुक्त करण्यासाठी मुक्तिपथ, गाव संघटना व जनतेच्या सहकार्याने ‘ग्रामपंचायत निवडणूक-दारूमुक्त निवडणूक’ अभियान चालविण्यात आले. यास उत्तम प्रतिसाद देत सहा तालुक्यातील २४५ गावांनी ठराव घेत दारूमुक्त निवडणुकीचा निर्धार केला हाेता. आरमोरी तालुक्यातील ३५०, गडचिरोली २४०, देसाईगंज २४५, कुरखेडा ३९५, कोरची १७५, धानोरा २७० अशा एकूण १६७५ उमेदवारांनी संकल्प पत्रावर स्वाक्षरी केली. यामुळे काही ठिकाणी दारूचे वाटप झाले असले तरी बहुतांश गावात दारूमुक्त निवडणूक पार पडली. विशेष म्हणजे, किटाळी येथील मुक्तिपथ गाव संघटनेच्या ३० महिलांनी उमेदवारांची बैठक घेऊन दारूचे वाटप करू नका, अन्यथा आम्ही मतदान करणार नाही,असे आवाहन केले होते. त्यानुसार त्या महिलांनी २.३० वाजता दरम्यान मतदानाचा हक्क बजावला.