राज्यातील पहिले बहुपयोगी वाहन गडचिरोली परिवहन विभागाच्या सेवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:36 AM2021-03-10T04:36:40+5:302021-03-10T04:36:40+5:30

या वाहनाचे लोकार्पण मंगळवारी (दि.९) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले. यावेळी ...

The first multi-purpose vehicle in the state is in the service of Gadchiroli Transport Department | राज्यातील पहिले बहुपयोगी वाहन गडचिरोली परिवहन विभागाच्या सेवेत

राज्यातील पहिले बहुपयोगी वाहन गडचिरोली परिवहन विभागाच्या सेवेत

Next

या वाहनाचे लोकार्पण मंगळवारी (दि.९) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी तेजबहादूर तिडके, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार, मोटार वाहन निरीक्षक सचिन जमखंडीकर, चेतनकुमार पाटील, योगेंद्र मोडक, प्रभाकर सावंत, हेमंत गावंडे, पोलीस निरीक्षक मंडलवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

आरटीओचे तपासणी वाहन दिसले की ते फक्त दंडात्मक कारवाईच करते, असा दृढ समज जनमानसांत आहे. परंतु दंडात्मक कारवाईशिवाय आरटीओ विभागाशी संबंधित विविध सुविधा आणि सेवा लोकांना सहज व सुलभरीत्या मिळाव्यात हा या विशेष वाहन बनविण्यामागील उद्देश आहे. जिल्हा नियोजन समितीमार्फत त्यासाठी विशेष केंद्रीय साहाय्य योजनेतून १७ लाख ६१ हजार रुपये मंजूर करण्यात आले. विविध शासकीय विभागांचे बळकटीकरण झाले पाहीजे, अशी सूचना जिल्हाधिकारी सिंगला यांनी केली होती. त्यानुसार जंगलव्याप्त, अतिदुर्गम व नक्षलप्रभावित गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना लायसन्स व वाहन नोंदणीसारखी कामे थेट त्यांच्या गावापर्यंत जाऊन करता येईल, अशी सोय या वाहनात केली असल्याचे यावेळी परिवहन अधिकारी भुयार यांनी सांगितले.

(बॉक्स)

अशा आहेत वाहनातील सोयी

सदर वाहनामध्ये जीपीएस ट्रॅकरपासून तर अतिवेगाने धावणाऱ्या वाहनांवर कारवाईसाठी स्पीड गड डिव्हाईसही बसविले आहे. तसेच वाय-फाय सुविधेसह एकाच वेळी किमान १० अर्जदारांना टॅबद्वारे ऑनलाइन लर्निंग लायसन्सची परीक्षा देता येईल. याशिवाय वाहन नोंदणी व वाहनकर भरण्याची सुविधा, ई-चलान सुविधा सुध्दा उपलब्ध करण्यात

आली आहे. याशिवाय जनतेस विभागाची कार्यपद्धती, रस्ता सुरक्षेविषयी प्रबोधन व आपल्या वाहनांची देखभाल व निगा राखण्यासंबंधी माहिती देण्याकरिता दृकश्राव्य यंत्रणा (एलसीडी प्रोजेक्टर) उपलब्ध केले आहे. अपघातामुळे रस्त्यावर निर्माण झालेला अडथळा किंवा अपघातग्रस्त वाहनास तातडीची मदत करता यावी म्हणून वाहनास टोविंग डिव्हाइस व विंच केबल बसविले आहे. यासोबतच सदर वाहन रस्त्यावर तपासणीस असताना रस्त्यावरील सर्व हालचाली चित्रित करण्यासाठी डॅश कॅमेराही

बसविण्यात आला आहे.

Web Title: The first multi-purpose vehicle in the state is in the service of Gadchiroli Transport Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.