पहिल्याच दिवाळीत विवाहितेवर काळाची झडप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 10:26 PM2018-11-10T22:26:03+5:302018-11-10T22:26:29+5:30

तालुक्यातील चांभार्डा येथील विवाहित महिलेला तिच्या गिरोला येथील माहेरी सर्पदंश झाल्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी ९ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली.

The first time in the Diwali, on the wedding, | पहिल्याच दिवाळीत विवाहितेवर काळाची झडप

पहिल्याच दिवाळीत विवाहितेवर काळाची झडप

Next
ठळक मुद्देसर्पदंशाने मृत्यू : दिवाळीच्या सणासाठी पतीसह गेली होती गिरोला येथे माहेरी

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : तालुक्यातील चांभार्डा येथील विवाहित महिलेला तिच्या गिरोला येथील माहेरी सर्पदंश झाल्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी ९ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली.
रिना अमोल कोडगले (२०) रा. चांभार्डा असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे की, धानोरा तालुक्याच्या गिरोला येथील रिना देशमुख हिचा विवाह चांभार्डा येथील अमोल कोडगले यांच्याशी एप्रिल २०१८ मध्ये झाला होता. पहिलीच दिवाळी असल्याने रिना ही अमोलसह मंगळवारी गिरोला येथे माहेरी गेली होती. बुधवार व गुरुवारी दिवाळीचा सण उत्साहात साजरा केला. परंतु शुक्रवारी नियतीला वेगळेच मान्य होते. शुक्रवारी सायंकाळी जेवणापूर्वी हात धुण्याकरिता रिना बाथरूमकडे गेली असता अंधारात दडून असलेल्या विषारी सापाने तिच्या उजव्या पायाला घोटेच्यावर दंश केला. याबाबत तिने पती अमोल व आपल्या आईला काहीतरी दंश झाल्याचे सांगितले. त्यांनी वेळीच शोध घेतला परंतु साप नेमका कोणत्या जातीचा हे समजून आले नाही. त्यानंतर त्यांनी रुग्णवाहिका व खासगी वाहन शोधण्याचा प्रयत्न केला परंतु वेळेवर काहीच उपलब्ध झाले नाही. शेवटी तिला दुचाकीने चातगाव येथील सर्च येथे नेण्यात आले. परंतु दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे रुग्णालय बंद होते. शेवटी दुचाकीवरूनच रिनाला घेऊन जिल्हा रुग्णालय गाठण्यासाठी निघाले. परंतु मधेच सोबतची एक दुचाकी बिघडली. त्यामुळे २० ते ३० मिनिटे उशिर झाला. जिल्हा रुग्णालयात जवळपास रात्री ९ वाजता भरती करण्यात आले. रिनाला आणतपर्यंत संपूर्ण शरीरभर विष पसरले. त्यामुळे तिचे शरीर उपचाराला फारसा प्रतिसाद देत नव्हते. अखेर ९.३० वाजताच्या सुमारास रिनाची प्राणज्योत मालवली. तिच्या मृत्यूमुळे माहेरी व सासरी शोककळा पसरली आहे.
आई झाली निराधार
विशेष म्हणजे, आईला एकटीच असलेल्या रिनाचे वडील ती तीन महिन्यांची असतानाच वारले होते. तेव्हापासून तिच्या आईने तिचे पालनपोषण केले. एकेक पै गोळा करून मुलीचे लग्न केले. मुलगी सासरी आनंदी होती. त्यामुळे आई सुद्धा समाधानाचे जीवन जगत होती. मात्र हे नियतीला पटले नसावे. तिची आई अनेक वर्षांपासून गिरोला आश्रमशाळेत स्वयंपाकासाठी सहकारी म्हणून काम करीत होती. रिनाच्या मृत्यूमुळे तिची आई निराधार झाली आहे.

Web Title: The first time in the Diwali, on the wedding,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.