धान पिकाच्या शेतीतच मत्स्यपालन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 10:12 PM2017-11-04T22:12:54+5:302017-11-04T22:13:05+5:30

Fishery in paddy crop | धान पिकाच्या शेतीतच मत्स्यपालन

धान पिकाच्या शेतीतच मत्स्यपालन

Next
ठळक मुद्देजानमपल्ली चेक येथे अनोखी शेती : जिल्हाधिकाºयांनी भेट देऊन केली पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : केवळ धान पिकाची शेती करून मोजका नफा न कमाविता अधिकाधिक आर्थिक उत्पन्न मिळावे या हेतूने सिरोंचा तालुक्याच्या जानमपल्ली चेक येथे शेतकरी दीपक दुर्गे यांनी धान पिकाच्या शेतीतच मत्स्यपालन प्रकल्प उभारून मासोळींचे पालन केले आहे. या अनोख्या प्रकल्प व शेतीला जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी भेट देऊन पाहणी केली.
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत नावीन्यपूर्ण बाबी अंतर्गत धान शेतीत मत्स्यपालन प्रकल्प उभारण्यात आला आहे. जानमपल्ली येथील प्रयोगशील शेतकरी दीपक दुर्गे यांनी या प्रकल्पाविषयी जिल्हाधिकारी नायक यांना सविस्तर माहिती दिली. तसेच सदर प्रकल्पाविषयी आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. प्रकाश पवार व तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक लांजेवार यांनी मार्गदर्शन मिळत असल्याचे दीपक दुर्गे यांनी सांगितले. या प्रकल्पाला जिल्ह्यातील अनेक शेतकरी भेटी देत असून अशा प्रकारची शेती तालुक्यातील इतर शेतकरी करण्याचा मानस व्यक्त करीत आहेत. या भेटीप्रसंगी उपविभागीय अधिकारी सचिन अंबासे, उपविभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे, प्रभारी तहसीलदार इंगळे, तालुका कृषी अधिकारी एच. डी. धुमाळ, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक ओ. वाय. लांजेवार, कृषी पर्यवेक्षक पांडे, कृषी सहायक खटिंग, पिवळतकर, लोंढे, नागरगोजे, वालदे हजर होते.
विविध प्रजातींचे टाकले मत्स्यबीज
आत्मा अंतर्गत शेतीत मत्स्यपालन प्रकल्प राबविला जात असून या प्रकल्पात रोहू, कतला, मृगळ, सायप्रेनसचे प्रत्येकी १ हजार २५० मत्स्यबीज टाकण्यात आले आहे. पुढील महिन्यात अन्य जातीचे पुन्हा १ हजार २५० मत्स्यबीज टाकणार असल्याचे शेतकरी दीपक दुर्गे यांनी सांगितले. मत्स्यपालन प्रकल्पात एक एकर क्षेत्रातून धान पिकाचे १.२० लाख रूपयांचे उत्पादन घेणार असल्याचे शेतकरी दुर्गे यांनी सांगितले. तसेच मत्स्यपालनातून चार ते पाच लाख रूपयांचे उत्पन्न होईल, असे ते म्हणाले. धान पिकाची शेती करीत असताना शेतकºयांना उत्पादनापेक्षा खर्चच अधिक करावा लागतो. यावर उपाय म्हणून शेतकºयांनी व्यावसायिक शेतीकडे वळणे गरजेचे आहे. हाच उद्देश ठेवून अनेक शेतकरी नफ्याची शेती करताना दिसून येतात.

Web Title: Fishery in paddy crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.