पाच नगर पंचायतींमधील ‘त्या’ आरक्षित जागा झाल्या सर्वसाधारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2021 05:00 AM2021-12-29T05:00:00+5:302021-12-29T05:00:40+5:30
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, सिरोंचा, चामोर्शी, धानोरा व कुरखेडा या ५ नगरपंचायतींचा समावेश आहे. तेथील सदस्यपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम २०२१-२२ जाहीर करण्यात आला आहे. नगरपंचायतीमधील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि त्यामधील महिलाऐवजी सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांच्या आरक्षणातील बदलास अंतिम मान्यता प्रदान करण्यात आली आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : नुकत्याच झालेल्या नगर पंचायत निवडणुकीच्या प्रक्रियेतून वगळलेल्या पाच नगर पंचायतींमधील नामाप्रसाठी राखीव जागांवरील आरक्षण आता हटविण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच त्या जागांसाठी नव्याने नामांकन भरण्याची प्रक्रिया सुरू हाेणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या १५ डिसेंबर २०२१ च्या आदेशानुसार आरक्षित असलेल्या नामाप्रच्या जागा अनारक्षित करण्यात आल्या. त्यात गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, सिरोंचा, चामोर्शी, धानोरा व कुरखेडा या ५ नगरपंचायतींचा समावेश आहे. तेथील सदस्यपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम २०२१-२२ जाहीर करण्यात आला आहे. नगरपंचायतीमधील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि त्यामधील महिलाऐवजी सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांच्या आरक्षणातील बदलास अंतिम मान्यता प्रदान करण्यात आली आहे. हा बदल तसेच प्रभागनिहाय आरक्षणाबाबत उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी माहिती जाहीर केली. विभागीय आयुक्तांच्या २७ डिसेंबर २०२१ च्या आदेशान्वये गडचिरोली जिल्ह्यातील ५ नगरपंचायतींमधील सदस्यपदांच्या प्रभागनिहाय आरक्षणाची माहिती जाहीर करण्यात आली.
अहेरी नगर पंचायत
आरक्षण बदलानंतर नगर पंचायत अहेरी येथे अनुसूचित जातीसाठी आरक्षित प्रभाग १७ तर अनुसूचित जाती (महिला) साठी प्रभाग १३, अनुसूचित जमातीसाठी प्रभाग क्रमांक २ आणि ७ तसेच महिलांकरिता प्रभाग -४, ९ व १६ राहणार आहे. याशिवाय सर्वसाधारण प्रवर्गासाठी आता प्रभाग १, ३, ५, ८, आणि १४ तर सर्वसाधारण (महिला) करिता प्रभाग ६, १०, ११, १२ आणि १५ राहणार आहे.
सिरोंचा नगर पंचायत
नगरपंचायत सिरोंचा येथे अनुसूचित जातीसाठी प्रभाग ४ व याच प्रवर्गात महिलांसाठी प्रभाग ८ व १७, अनुसूचित जमातीसाठी प्रभाग २ तर महिलांसाठी प्रभाग ७, सर्वसाधारण प्रवर्गासाठी प्रभाग क्रमांक १, ५, ६, १०, ११ आणि १४, तर सर्वसाधारण महिलांसाठी प्रभाग ३, ९, १२, १३, १५ आणि १६ राहणार आहे.
चामोर्शी नगर पंचायत
चामोर्शी येथे अनुसूचित जातीसाठी प्रभाग ४ तर महिलांसाठी प्रभाग ६, अनुसूचित जमाती महिलांसाठी प्रभाग १३, सर्वसाधारण प्रवर्गासाठी प्रभाग २, ७, ९, १०, ११, १२ आणि १६ तर सर्वसाधारण महिलांसाठी प्रभाग १, ३, ५, ८, १४, १५ आणि १७ राखीव राहणार आहेत. यामुळे ओबीसी प्रवर्गातील इच्छुकांचा हिरमाेड झाला आहे.
धानोरा नगर पंचायत
धानोरा येथे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी प्रभाग क्रमांक 17, तर अजा महिलांसाठी प्रभाग १, अनुसूचित जमातीसाठी प्रभाग ६, १० तर महिलांसाठी प्रभाग ४, १२ आणि १४ राहणार आहे. सर्वसाधारण प्रवर्गासाठी प्रभाग ५, ९, ११ १५ आणि १६, तर सर्वसाधारण महिलांसाठी प्रभाग २, ३, ७, ८ आणि १३ राहतील.
कुरखेडा नगर पंचायत
नगरपंचायत कुरखेडा येथे अनुसूचित जातीसाठी प्रभाग १४ व अजा महिलांसाठी प्रभाग ४, १३, अनुसूचित जमातीसाठी प्रभाग ९, अज महिलांसाठी प्रभाग ११ व १६, तसेच सर्वसाधारण प्रवर्गासाठी प्रभाग २, ३, ६, १२, १५ आणि १७, तर सर्वसाधारण महिलांसाठी १, ५, ७, ८ आणि १० हे प्रभाग आरक्षित राहणार आहेत.