समस्यांचे निराकरण विहीत वेळेत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 12:25 AM2017-08-02T00:25:14+5:302017-08-02T00:25:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : महसूल अधिकारी प्रशासनाचा कणा असून तो लोकप्रतिनिधी व जनतेमधील महत्त्वाचा दुवा आहे. जमिनींच्या विविध प्रकरणाशी निगडीत असलेला आणि शेतकºयांच्या दैनंदिन जिव्हाळ्याच्या प्रश्नांचा ज्याच्याशी संबंध येतो तो आपला विभाग असल्यामुळे त्यांच्या समस्यांचे निराकरण कालमर्यादेत करा. तसेच कार्यालयात येणाºया नागरिकांचे समाधान होईल असे उत्तर द्या व त्यांचे प्रश्न समजुन घ्या, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात महसूल दिन मंगळवारी साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी महेश आव्हाड, सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनावणे, पुरवठा अधिकारी चांदूरकर, उपजिल्हाधिकारी सुनिल सुर्यवंशी, माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, पोलीस उपअधीक्षक गणेश बिरादार उपस्थित होते.
याप्रसंगी शेतकºयांना सातबारा, शिधापत्रिका, विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र जिल्हाधिकारी नायक यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी विपीन इटनकर, निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनावणे, सुनिल सुर्यवंशी, अशोक चौधरी, अप्पर जिल्हाधिकारी महेश आव्हाड यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. संचालन प्रभाकर कुबडे यांनी केले तर आभार एस. के. वासनिक यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी कार्यालयातील विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या अधिकारी व कर्मचाºयांचा सन्मान
४जि. प., पं. स. निवडणूक प्रक्रियेत उत्कृष्ट काम केल्याबद्दल प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात आला. यामध्ये अपर जिल्हाधिकारी महेश आव्हाड , सहाय्यक जिल्हाधिकारी विपीन इटनकर, निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनावणे, पुरवठा अधिकारी चांदूरकर, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत देठणकर, आरटीओ अधिकारी शांताराम फासे यांचा समावेश आहे. तसेच महसूल विभागातील कर्मचारी नायब तहसिलदार चडगुलवार, दहीकर, हरीश बांबोळे, मनोज कंगाले, स्विय सहाय्यक कोवे, येरमे, राऊत, चाफले, चिताडे, निसार, शिपाई शेडमाके आदींचा समावेश आहे.