३७ बटालियन प्राणहिता कॅम्पस अहेरीत ध्वजारोहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:43 AM2021-08-18T04:43:10+5:302021-08-18T04:43:10+5:30

सीआरपीएफ ३७ बटालियनचे कमांडंट एम. एच. खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली कमांडिंग ऑफिसर राम रस मीना यांनी क्वार्टर गार्डमध्ये स्पेशल ...

Flag hoisting at 37th Battalion Pranhita Campus Aheri | ३७ बटालियन प्राणहिता कॅम्पस अहेरीत ध्वजारोहण

३७ बटालियन प्राणहिता कॅम्पस अहेरीत ध्वजारोहण

Next

सीआरपीएफ ३७ बटालियनचे कमांडंट एम. एच. खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली कमांडिंग ऑफिसर राम रस मीना यांनी क्वार्टर गार्डमध्ये स्पेशल गार्डकडून सलामी स्वीकारून राष्ट्रीय ध्वज फडकविला. त्यानंतर राम रस मीना यांनी आपल्या संबोधनात सीआरपीएफच्या गौरवशाली इतिहासाबद्दल माहिती दिली. सीआरपीएफ हे देशातील सर्वांत मोठे निमलष्करी दल आहे आणि सीआरपीएफच्या अभिमानास्पद इतिहासात अनेक अधिकारी आणि जवान आपल्या प्राणांची आहुती देऊन देशाच्या सुरक्षा आणि अखंडतेसाठी नेहमीच तयार असतात. स्वातंत्र्यदिनाप्रसंगी १५० शौर्यचक्रांसह १५०, सीआरपीएफच्या शूर अधिकारी आणि जवानांच्या अदम्य साहस आणि शौर्यासाठी १ राष्ट्रपती शौर्यपदक अधिकारी आणि इतर जवानांना पोलीस शौर्यपदक प्रदान करण्यात आले आहे.

द्वितीय कमांडिंग ऑफिसर राम रस मीना, उपकमांडंट राजेंद्र सिंह, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. संपत कुमार एम., वैद्यकीय अधिकारी अरविंद सरोटे आणि अधिनस्थ अधिकारी आणि जवान उपस्थित होते.

170821\img-20210817-wa0084.jpg

37 बटालियन CRPF ने 75 वा स्वातंत्र्य दिन प्राणहिता कॅम्पस अहेरी येथे साजरा केला

Web Title: Flag hoisting at 37th Battalion Pranhita Campus Aheri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.