चाेप येथे ग्रामसुधार परिवर्तन पॅनलचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:37 AM2021-01-23T04:37:10+5:302021-01-23T04:37:10+5:30

काेेरेगाव/चाेप : चाेप ग्रामपंचायतीवर माजी सरपंच आत्माराम सूर्यवंशी समर्थित ग्रामसुधार पॅनलचे सात उमेदवार विजयी झाले आहेत. तर ग्रामविकास पॅनलचे ...

Flag of the Village Improvement Transformation Panel at Chap | चाेप येथे ग्रामसुधार परिवर्तन पॅनलचा झेंडा

चाेप येथे ग्रामसुधार परिवर्तन पॅनलचा झेंडा

Next

काेेरेगाव/चाेप : चाेप ग्रामपंचायतीवर माजी सरपंच आत्माराम सूर्यवंशी समर्थित ग्रामसुधार पॅनलचे सात उमेदवार विजयी झाले आहेत. तर ग्रामविकास पॅनलचे तीन उमेदवार, जनता पॅनलचा एक उमेदवार निवडून आला आहे. चाेप ग्रामपंचायतीत एकूण ११ सदस्य आहेत. बाेडधा ग्रामपंचायतीत महाविकास आघाडीचे नऊ उमेदवार निवडून आले आहेत. तर आदर्श पॅनलचे दाेन सदस्य बिनविराेध निवडून आले आहेत. माजी सरपंच उद्धव गायकवाड, महादेव गायकवाड समर्थित उमेदवार निवडून आले आहेत.

वैरागडात बाेडणे गटाचे वर्चस्व

वैरागड : आरमाेरी तालुक्यातील वैरागड ग्रामपंचायतीत भास्कर बाेडणे गटाचे सहा सदस्य, भाेलू साेमनानी गटाचे चार सदस्य, माजी जि. प. सभापती विश्वास भाेवते यांच्या गटाचे दाेन सदस्य व एक अपक्ष उमेदवार निवडून आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विजयाचा जल्लाेष

फाेटाे ...... गडचिराेली येथे ग्रा. पं. निवडणूक विजयाचा जल्लाेष करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व नवनिर्वाचित सदस्य.

गडचिराेली : गडचिराेली, अहेरी, आरमाेरी या तीन विधानसभा क्षेत्रात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसशी समर्थित अनेक सदस्य निवडून आले आहेत, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केला आहे. दरम्यान, ग्रा. पं. निवडणुकीतील विजयाचा जल्लाेष पक्षातर्फे गडचिराेली, अहेरी व आरमाेरी तालुका मुख्यालयी करण्यात आला. गडचिराेली, आरमाेरी विधानसभा क्षेत्रात पहिल्यांदाच माजी मंत्री तथा विद्यमान आ. धर्मरावबाबा आत्राम, जि. प. च्या माजी अध्यक्षा भाग्यश्री आत्राम, युवा नेते ऋतुराज हलगेकर यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांच्या नेतृत्वात ग्रा. पं. च्या निवडणुका लढविण्यात आल्या. चामाेर्शी तालुक्यातील १४, गडचिराेली-११, काेरची- ८, कुरखेडा- ८, देसाईगंज- ५, धानाेरा ८ व आरमाेरी तालुक्यातील ४ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता स्थापन हाेणार आहे, असा दावा जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांनी केला.

तळाेधीत गावविकास आघाडीचा विजय

फाेटाे ... आनंदाेत्सव साजरा करताना तळाेधी ग्रामपंचायतीचे सदस्य.

चामाेर्शी : तळाेधी माेकासा ग्रामपंचायतीवर गावविकास आघाडीने झेंडा राेवला आहे. एकूण ११ सदस्यांपैकी गावविकास आघाडीचे १० सदस्य निवडून आले आहेत. तर एका अपक्षाने बाजी मारली. निवडून आलेल्या गावविकास आघाडीच्या उमेदवारांत मनाेहर बाेदलकर, विनाेद सातपुते, गेडाम, किशाेर कुनघाडकर, हिरामण बिश्राम, विद्या मेश्राम, शाेभा ताेडासे, सुनिता चाटारे, ज्याेती बारसागडे, लता वासेकर यांचा समावेश आहे. तृप्ती माेहन चिळंगे या अपक्ष उमेदवार निवडून आल्या आहेत. विजयी उमेदवारांचा गावकऱ्यांनी सत्कार केला.

Web Title: Flag of the Village Improvement Transformation Panel at Chap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.