२५ एकर शेतातील तूर पीक आगीने जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 11:31 PM2018-02-03T23:31:46+5:302018-02-03T23:32:11+5:30

येथून सात किमी अंतरावरील महागावलगत असलेल्या शंकर नानाजी गोंगले यांच्या मालकीच्या शेतातील तुरीच्या पिकाला शनिवारी दुपारी १२ वाजता अचानक आग लागल्याने २५ एकर शेतामधील तुरीचे पीक जळून खाक झाले.

Flame of 25 acres of turf in the field, fire | २५ एकर शेतातील तूर पीक आगीने जळून खाक

२५ एकर शेतातील तूर पीक आगीने जळून खाक

Next
ठळक मुद्देमहागाव येथील घटना : उभ्या पिकाला भर दुपारी लागली आग

लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : येथून सात किमी अंतरावरील महागावलगत असलेल्या शंकर नानाजी गोंगले यांच्या मालकीच्या शेतातील तुरीच्या पिकाला शनिवारी दुपारी १२ वाजता अचानक आग लागल्याने २५ एकर शेतामधील तुरीचे पीक जळून खाक झाले.
शंकर नानाजी गोंगले यांच्या मालकीचे महागाव लगत २५ एकर शेत असून या शेतात त्यांनी तुरीचे पीक घेतले होते. यात १२ एकरातील तूर पीक कापून ते एका ठिकाणी जमा करून ठेवले होते. तसेच उर्वरित १३ एकरातील तुरीचे पीक उभे होते. मात्र शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास उभ्या तुरीच्या पिकाला आग लागली. आग लागल्याचे समजताच शंकर गोंगले व तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संजय अलोने यांनी शेताकडे धाव घेतली. संजय अलोने यांनी त्वरित अहेरी नगर पंचायतचे मुख्याधिकारी डॉ. कुलभूषण रामटेके यांना याची माहिती दिली. लगेच अहेरी नगर पंचायतचे अग्नीशामन वाहन निघाले मात्र तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविणे अशक्य होते. आगीत शेतातील संपूर्ण पीक जळून खाक झाले. शेतकरी शंकर गोंगले यांचे ८ ते १० लाखांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.
पीक आगीत जळत असल्याचे बघून शंकर गोंगले यांनी टाहो फोडला. माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस कर्मचारी व महसूल विभागाचे कर्मचारी पोहोचले. तलाठी राजेंद्र आव्हाड यांनी पंचनामा केला. ही आग नैसर्गिकरित्या लागली की कोणी मुद्दाम ही आग लावली हे अद्याप स्पष्ट झाले नाही.पुढील तपास अहेरी पोलीस करीत आहे. सदर शेतकºयाला नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Flame of 25 acres of turf in the field, fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग