कोल्हापूरच्या महालक्ष्मीची ज्योत आरमोरीत
By admin | Published: October 14, 2015 01:51 AM2015-10-14T01:51:41+5:302015-10-14T01:51:41+5:30
या वर्षीच्या नवरात्र उत्सवात आरमोरी येथे कोल्हापूरच्या प्रसिद्ध धार्मिक स्थळ महालक्ष्मी ज्योत आणण्यात आली ....
४६ वर्षांची परंपरा : जुन्या बसस्थानक परिसरात स्थापना
आरमोरी : या वर्षीच्या नवरात्र उत्सवात आरमोरी येथे कोल्हापूरच्या प्रसिद्ध धार्मिक स्थळ महालक्ष्मी ज्योत आणण्यात आली असून ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढून सदर ज्योतीची जुन्या बसस्थानक वरील दुर्गा माता मंडपात मंगळवारी प्रतिस्थापना करण्यात आली.
आरमोरी येथील दुर्गा उत्सव संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे. येथील दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने तयार करण्यात येणारे धार्मिक स्थळाचे देखावे पाहण्यासाठी संपूर्ण विदभार्तील जनता आरमोरी येथे येतात. त्यामुळे दरदिवशी आरमोरी येथे हजारो भाविकांची गर्दी उसळते . या वर्षी दक्षिण भागातील प्रसिद्ध तिरुपती बालाजी चे मंदिराचा देखावा असल्यामुळे नागरिकांमध्ये उत्साह वाढला आहे . य दुर्गा उत्सवाच्या आनंदात जुन्या बसस्थानका जवळील नवदुर्गा मंडलाच्या दुर्गा माता मंडपात ठेवण्यात येणारी ज्योत आणखीनच भर घालते. विशेष म्हणजे सदर ज्योत भारतातील प्रसिद्ध धार्मिक स्थळावरून आणण्यात येते .
या वर्षी कोल्हापूर येथील महालक्ष्मीच्या मंदिरातून ज्योत आणण्यात आली . ज्योतीचे आरमोरी येथे मंगळवारी सकाळी ९ वाजता आगमन झाले त्यानंतर जीवानी राईस मिल येथून ढोल, ताशे, दिंडी, गोंडीनृत्य व भजनाच्या गजरात मिरवणूक काढून सदर ज्योतीची जुन्या बसस्थानक परिसरातील दुर्गा मातेच्या मंडपात प्रतिस्थापना करण्यात आली, या मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी झाले होते. सदर ज्योत नवरात्र भर प्रज्वलित ठेवली जाणार आहे. या ठिकाणी पहाटे ४ वाजेपासून भजन कीर्तन केले जाते. मागील ४६ वर्षांपासून ही परंपरा कायम आहे.
सर्वधर्मसमभावाचे प्रतीक ज्योत
प्रत्येक भाविक दूरच्या धार्मिक स्थळी जाऊन प्रत्यक्ष पूजाअर्चा करू शकत नाही , त्यामुळे त्या ठिकाणची ज्योत आणून तिची पूजाअर्चा केली जाते . या पूर्वी अमरनाथ, वैष्णवी देवी, सप्तश्रुंगी, पावागड येथील ज्योत आणण्यात आली. ही जोत आणण्यासाठी नवदुर्गा उत्सवात सहभागी असलेले सर्वधर्मियांचे सहकार्य लाभते. त्यामुळे हा सोहळा सर्व धर्मसमभावाचे प्रतीक मानले जाते. विशेष म्हणजे प्रज्वलित ज्योत हजारो किलोमीटरचे अंतर पार करीत आणणे हे अत्यंत जोखमीचे काम आहे. मात्र हे काम नवदुर्गा उत्सव मंडळाचे पदाधिकारी मागील अनेक वषार्पासून चांगल्या पद्धतीने पार करीत आहेत.