पूर ओसरला, जनजीवन पूर्वपदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 01:19 AM2017-07-21T01:19:16+5:302017-07-21T01:19:16+5:30

सोमवारी व मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे लहान मोठ्या नदी व नाल्यांना पूर आला होता.

Floods, life-long lifespan | पूर ओसरला, जनजीवन पूर्वपदावर

पूर ओसरला, जनजीवन पूर्वपदावर

Next

गुरूवारी पावसाने घेतली उसंत : अनेक मार्ग मोकळे; महसूल प्रशासनातर्फे नुकसानीचे पंचनामे सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सोमवारी व मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे लहान मोठ्या नदी व नाल्यांना पूर आला होता. पुराचे पाणी गावात शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र बुधवारी दुपारनंतर पावसाने उसंत घेतली. गुरूवारीही अपवाद वगळता पाऊस झाला नाही. त्यामुळे गुरूवारी जनजीवन पूर्वपदावर आले. मात्र या मूसळधार पावसाने २९२ घरांची पडझड झाली असल्याचे प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या सर्व्हेत दिसून आले आहे.
पावसाअभावी धान रोवणीची कामे खोळंबली होती. संपूर्ण जिल्ह्यात दोन दिवस दमदार पाऊस झाल्याने एकाच वेळी रोवणीच्या कामाला शेतकऱ्यांनी सुरूवात केली. जुलै महिना लागला तरी मामा तलाव कोरडेच होते. दोन दिवसाच्या पावसामुळे मात्र तलावांमध्ये जलसाठा निर्माण झाला आहे. वैरागड-मानापूर मार्गावरील वैलोचना नदी पूल मागील आठ दिवसात दोनवेळा बुडला होता. पावसाने उसंत घेतल्याने या मार्गावरची वाहतूक बुधवारी पूर्ववत सुरू झाली. धानोरा तालुक्यातील रांगी-निमगाव दरम्यानच्या नाल्यावरील पुलावर पाण साचले होते. त्यामुळे रांगी-गडचिरोली दरम्यानची वाहतूक ठप्प झाली होती. सदर मार्ग पूर्ववत सुरू झाला. सिरोंचा महामार्गावरील मोसम व नंदीगावदरम्यान झिमेला नाल्याच्या पुलाजवळ झाड कोसळले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. गावातील नागरिकांनी झाड बाजुला केले. एटापल्ली तालुका मुख्यालयापासून एक किमी अंतरावर असलेल्या डुम्मी नाल्याला पूर आल्याने या ठिकाणचीही वाहतूक ठप्प पडली होती. गुरूवारी डुम्मी नाल्यावरचाही पूर ओसरला.

पूरग्रस्त भामरागड झाले चिखलमय, घरात-दुकानातही चिखल
अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका भामरागड शहराला बसला. भामरागड शहर अगदी पर्लकोटा नदीच्या काठावर वसले आहे. पर्लकोटा नदीचे पाणी बुधवारच्या रात्री भामरागड शहरात शिरले. त्यामुळे येथील दुकानदार, नागरिकांना इमारतीमधून कोणतेच सामान काढता आले नाही. पुराचे पाणी शिरताच नागरिकांनी जीव वाचविण्यासाठी सुरक्षित जागेचा शोध घेतला. यामुळे मनुष्यहानी झाली नसली तरी प्रचंड प्रमाणात वित्तहानी झाली आहे. पुराचे पाणी जवळपास २४ तास दुकानांमध्ये शिरून होते. दुकानदारांनी व्यक्त केलेल्या प्राथमिक अंदाजानुसार सुमारे २४ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. पूर ओसरला मात्र गावात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. घरातही चिखल पसरला आहे. शेतीची कामे सोडून आता घराची डागडुजी व साफसफाई करण्याचे काम भामरागडवासीयांना करावे लागत आहे.

Web Title: Floods, life-long lifespan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.