पक्ष संघटन बळकटीवर भर द्या

By Admin | Published: July 17, 2016 01:11 AM2016-07-17T01:11:06+5:302016-07-17T01:11:06+5:30

आगामी नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात होऊ घातलेल्या गडचिरोली व देसाईगंज नगर परिषदेच्या तसेच जानेवारी,

Focus on party organizational strength | पक्ष संघटन बळकटीवर भर द्या

पक्ष संघटन बळकटीवर भर द्या

googlenewsNext

सुरेश पोरेड्डीवार : देसाईगंजला पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक
देसाईगंज : आगामी नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात होऊ घातलेल्या गडचिरोली व देसाईगंज नगर परिषदेच्या तसेच जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच सज्ज व्हावे, पक्ष संघटन बळकट करण्यावर भर द्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार यांनी शनिवारी देसाईगंज येथे आयोजित पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले.
बैठकीत प्रमुख अतिथी म्हणून राकाँचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, रायुकाँचे जिल्हाध्यक्ष रिंकू पापडकर, जिल्हा सरचिटणीस श्याम धाईत, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष लतीफ शेख, राकाँचे उपाध्यक्ष कमलेश उके, जयदेव मानकर, तालुकाध्यक्ष नित्यानंतर बुद्धे, माजी प्रदेश सचिव युनिस शेख, शहर महासचिव अजय गोरे, यशवंत डिसुजा, क्रिष्णा आंबेकर, डॉ. बुद्धघोष मेश्राम, युवा तालुकाध्यक्ष हेमंत परशुरामकर उपस्थित होते.
अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून सत्तेत आलेल्या भाजप सरकारविरोधात जनतेमध्ये रोष आहे. याचा फायदा कार्यकर्त्यांनी घ्यावा, असे आवाहनही सुरेश पोरेड्डीवार यांनी केले. यावेळी शहर व तालुका कार्यकारिणीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तपत्र जिल्हाध्यक्षांच्या हस्ते वितरित करण्यात आले. संचालन रोशन शेंडे, प्रास्ताविक शहराध्यक्ष ओमप्रकाश शर्मा तर आभार अजय गोरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी शैलेश पोटुवार, नागेश शेंडे, सूरज ठवरे, रफीक शेख, किशोर फाफट, नागोराव कवासे, महादेव कावळे, विलास लोखंडे, दीपक नागदेवे, प्रतिभा साखरे, मनोज तलमले, इकबाल, नागेश शेंडे, अजय पवार, विक्रांत कांबळे, दीपक सहारे यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)

धानोरातही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन
धानोरा येथील विश्रामगृहात आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीला राकाँ कार्यकारी जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, रिंकू पापडकर, डॉ. हेमराज मसराम, सोपानदेव म्हशाखेत्री उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँगे्रसच्या तालुकाध्यक्षपदी प्रमोद देवीकर यांची नियुक्ती करण्यात आली. याप्रसंगी लुकेश बुरडे, किशोर मांदाळे, धनराज गुरनुले, सोनू मारबते, भारत मसराम, इजाज शेख, मंगेश राजगडे, दिलीप उईके, पुरूषोत्तम ठाकरे, गजानन मोहुर्ले, निखील जराते, सुनील दुग्गा, समीर मुनघाटे, भक्तदास गडपायले, अविनाश गावराणे, बापू शेख, देवानंद भेंडारे, राजू शेंडे हजर होते.

 

Web Title: Focus on party organizational strength

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.