गरीब व्यक्ती योजनांचा केंद्रबिंदू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 12:30 AM2018-06-15T00:30:36+5:302018-06-15T00:30:36+5:30

गरीब व्यक्तीला केंद्रस्थानी मानून केंद्र व राज्य शासन योजना तयार करीत आहे. प्रशासनाने या योजनांची निट अंमलबजावणी करावी. तसेच योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन आमदार कृष्णा गजबे यांनी केले.

The focus of poor person schemes | गरीब व्यक्ती योजनांचा केंद्रबिंदू

गरीब व्यक्ती योजनांचा केंद्रबिंदू

googlenewsNext
ठळक मुद्देआमदारांचे प्रतिपादन : पोलीस स्टेशनच्या वतीने पोटगाव येथे जनजागरण मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : गरीब व्यक्तीला केंद्रस्थानी मानून केंद्र व राज्य शासन योजना तयार करीत आहे. प्रशासनाने या योजनांची निट अंमलबजावणी करावी. तसेच योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन आमदार कृष्णा गजबे यांनी केले.
देसाईगंज पोलीस स्टेशनच्या वतीने तालुक्यातील पोटगाव येथे जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यादरम्यान मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश काळे, पोलीस निरिक्षक एस. डी. मांडवकर, पोलीस उपनिरिक्षक सुरज गोरे, फुलेकर, सरपंच विनायक धारगावे, उपसरपंच रूपाली गावतुरे, मुख्याध्यापक हरडे, पोलीस पाटील बासरीधर दोनाडकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष मोरेश्वर गजपुरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, आरोग्य विभाग, कृषी विभाग, बांधकाम विभागाचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील सर्वसामान्य व गरीब नागरिकांना योजनांची माहिती देण्याच्या उद्देशाने जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पावसाळ्याचे दिवस असतानाही स्थानिक नागरिकांनी तसेच सभोवतालच्या नागरिकांनी मेळाव्याला मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली होती.
पुढे मार्गदर्शन करताना आमदार कृष्णा गजबे यांनी राज्य शासन सत्तेत आल्यापासून अनेक नाविन्यपूर्ण व महत्त्वाच्या योजना सुरू केल्या आहेत. शासनाच्या एकूण खर्चापैकी जास्तीत जास्त खर्च गरीबांच्या योजनांवर खर्च होईल, यासाठी शासन प्रयत्नरत आहे. आरमोरी विधानसभा क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा केला आहे. त्याला यश मिळून काही समस्या सुटल्या सुध्दा आहे, असे मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी पोलीस व गावकऱ्यांनी सहकार्य केले.

Web Title: The focus of poor person schemes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.