विद्यार्थ्यांमध्ये मूल्य रूजविण्यावर भर द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 12:47 AM2018-07-25T00:47:17+5:302018-07-25T00:48:33+5:30
समता, स्वातंत्र, बंधुता व न्याय ही भारतीय संविधानातील मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी मूल्यवर्धन कार्यक्रम आवश्यक आहे. आजचा विद्यार्थी हा उद्याचा भावी नागरिक आहे. म्हणून देशाला सुजान नागरिक तयार करण्यासाठी मूल्यवर्धन कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी असे प्रतिपादन जिल्हा सातत्यपुर्ण व्यावसायिक विकास संस्थेचे प्राचार्य डॉ.शरदचंद्र पाटील यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : समता, स्वातंत्र, बंधुता व न्याय ही भारतीय संविधानातील मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी मूल्यवर्धन कार्यक्रम आवश्यक आहे. आजचा विद्यार्थी हा उद्याचा भावी नागरिक आहे. म्हणून देशाला सुजान नागरिक तयार करण्यासाठी मूल्यवर्धन कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी असे प्रतिपादन जिल्हा सातत्यपुर्ण व्यावसायिक विकास संस्थेचे प्राचार्य डॉ.शरदचंद्र पाटील यांनी केले. ते स्थानिक डायट संस्थेत आयोजित चार दिवसीय कार्यशाळेत बोलत होते.
महाराष्ट्र राज्य विद्या प्राधिकरण व शांतीलाल मुथ्था फाऊंडेशन पुणे यांचे संयुक्त विद्यमाने मूल्यवर्धन हा कार्यक्रम राज्यात राबीविला जाणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हास्तरीय चारदिवसीय कार्यशाळेचे आयोजन डीआयईसीपीडीद्वारे करण्यात आले होते.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य डॉ.शरदचंद्र पाटील तर प्रमुख उपस्थिती अधिव्याख्याता डॉ.नरेश वैद्य, ए.एस.जाधव, एम.आर.अघोर, पी.आर.चव्हाण, कु.एल्लेपवार, केंद्रप्रमुख गौतम मेश्राम, गटसमन्वयक निखील कुमरे आदी उपस्थित होते.
मूल्यवर्धन कार्यक्रम हा जिल्हातील तीन तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत राबविण्यात येत आहे. त्यात चामोर्शी, गडचिरोली व आरमोरी या तालुक्यांचा समावेश आहे. इयत्ता पहिली ते चवथी या वर्गांसाठी हा कार्यक्रम राबवीला जाणार आहे. ार्यशाळेला तज्ञ मार्गदर्शक म्हणून विजय मेश्राम, के.एम.झाडे, मुथ्था फाऊंडेशनचे प्रतिनिधी सचिन साठे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन राजन बोरकर यांनी केले तर आभार हितेश ठिकरे यांनी मानले.