आचारसंहितेचे काटेकोर पालन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 12:09 AM2017-09-09T00:09:17+5:302017-09-09T00:09:40+5:30

जिल्ह्यातील २६ ग्रामपंचायतींसाठी १४ आॅक्टोबर रोजी मतदान घेतले जाणार आहे. निवडणुकीची आचारसंहिता १ सप्टेंबरपासून लागू करण्यात आली आहे

Follow the code of conduct strictly | आचारसंहितेचे काटेकोर पालन करा

आचारसंहितेचे काटेकोर पालन करा

Next
ठळक मुद्देनिवासी उपजिल्हाधिकाºयांचे आवाहन : पत्रकार परिषदेत दिली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यातील २६ ग्रामपंचायतींसाठी १४ आॅक्टोबर रोजी मतदान घेतले जाणार आहे. निवडणुकीची आचारसंहिता १ सप्टेंबरपासून लागू करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी नागरिक व राजकीय पक्षांनी निवडणूक आचारसंहितेचे पालन करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवाने यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी निवडणुकीसंदर्भात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावर्षी पहिल्यांदाच सरपंचाची निवड थेट जनतेतून होणार आहे. नामनिर्देशन भरण्याची प्रक्रिया संगणकीकृत पध्दतीने राबविली जाणार आहे. सरपंच पदाच्या जागेची पहिली मतपत्रिका राहणार असून मतपत्रिकेचा फिका निळा रंग राहणार आहे. तसेच मतपत्रिकेवर नोटाचा पर्याय राहणार आहे. सरपंच व सदस्य पदाच्या निवडणुकीकरिता उमेदवाराने करावयाच्या खर्चाची मर्यादा वाढविण्यात आली आहे. सात ते नऊ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीत सदस्याला प्रचारासाठी २५ हजार रूपये व सरपंचाला ५० हजार रूपये खर्च करता येणार आहे. ११ ते १३ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीत सदस्याला ३५ हजार रूपये तर सरपंचाला एक लाख रूपये मर्यादा देण्यात आली आहे. १५ ते १७ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीत सदस्याला ५० हजार रूपये तर सरपंच पदासाठी उभा असलेल्या व्यक्तीला १ लाख ७५ हजार रूपये एवढी खर्चाची मर्यादा देण्यात आली आहे.
गडचिरोली जिल्ह्याचा भाग अतिशय दुर्गम व नक्षलग्रस्त असल्याने १४ आॅक्टोबर रोजी सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान राहणार आहे. १६ आॅक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवाने यांनी दिले आहे.
पत्रकार परिषदेला नायब तहसीलदार एस. के. चडगुलवार, लिपिक राऊत यांच्यासह राकाँचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, काँग्रेसचे प्रभाकर वासेकर, भाजपाचे विलास भांडेकर, राकाँचे हरिदास गेडाम उपस्थित होते.

Web Title: Follow the code of conduct strictly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.