लसीकरण व सुविधांसाठी शासनस्तरावर पाठपुरावा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:37 AM2021-05-18T04:37:46+5:302021-05-18T04:37:46+5:30
चामाेर्शी तालुक्यातील काेविडचा आढावा घेण्यासाठी खासदारांनी अधिकारी व पदाधिकाऱ्यांची बैठक १७ मे राेजी घेतली. बैठकीला जि.प. चे कृषी सभापती ...
चामाेर्शी तालुक्यातील काेविडचा आढावा घेण्यासाठी खासदारांनी अधिकारी व पदाधिकाऱ्यांची बैठक १७ मे राेजी घेतली.
बैठकीला जि.प. चे कृषी सभापती रमेश बारसागडे, चामोर्शीचे उपविभागीय अधिकारी उत्तम तोडसाम, तहसीलदार जितेंद्र शिकतोडे, नगर पंचायतचे मुख्याधिकारी सतीश चौधरी, आदिवासी मोर्चाचे प्रदेश महामंत्री प्रकाश गेडाम, प्रदेश सदस्य स्वप्निल वरघंटे, आदिवासी मोर्चाचे प्रदेश सदस्य संदीप कोरेत, तालुका अध्यक्ष दिलीप चलाख, तालुका महामंत्री साईनाथ बुरांडे, भाजपचे ज्येष्ठ नेते जयराम चलाख, नगर पंचायत सभापती, नगरसेवक, अन्य अधिकारी व विभागप्रमुख उपस्थित होते.
कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर त्यांना विलगीकरण कक्ष किंवा गृह विलगीकरणात १४ दिवस ठेवण्यात यावे. तेव्हाच संबंधित व्यक्ती बाहेर फिरणार नाही. सदर व्यक्ती पुन्हा बाधित झाल्यास इतरांना त्याच्यापासून धोका होणार नाही. तसेच गावातील दक्षता समितीने गावातील बाधित व संशयित नागरिकांची माहिती प्रशासनास द्यावी. यासाठी त्यांना सतर्क राहण्यास सांगावे, असे निर्देशही खा. अशोक नेते यांनी दिले.
बाॅक्स
तालुक्यात साडेसाेळा हजार लाेकांची काेराेना चाचणी
चामोर्शी तालुक्यात आतापर्यंत १६ हजार ५९६ लाेकांची काेराेना चाचणी करण्यात आली आहे. तपासणीत एकूण १ हजार २३९ लाेक बाधित आढळून आले आहेत. यावर्षी २७३ लाेक काेराेनाबाधित आढळून आले. सध्या ६२ बाधित रुग्णांवर काेविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. तसेच आतापर्यंत ४५ वर्षांवरील ११ हजार ४७१ नागरिकांना काेराेना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देण्यात आला तर १ हजार ४५१ लाेकांना दुसरा डाेस देण्यात आला, अशी माहिती तालुका आराेग्य अधिकारी व वैद्यकीय अधीक्षकांनी दिली.
===Photopath===
170521\17gad_1_17052021_30.jpg
===Caption===
अधिकाऱ्यांकडून माहिती घेताना खासदार अशाेक नेते, साेबत पदाधिकारी.