मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत मिळण्यासाठी पाठपुरावा करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 10:25 PM2019-04-19T22:25:06+5:302019-04-19T22:25:44+5:30

अंशकालीन पेंशन योजना लागू असलेल्या कर्मचाºयाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला शासनाकडून मदत व इतर शासकीय लाभ मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटना पाठपुरावा करेल, असा निर्णय बुधवारी पार पडलेल्या सभेत घेण्यात आला.

Follow-up to help the family of the deceased employees | मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत मिळण्यासाठी पाठपुरावा करणार

मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत मिळण्यासाठी पाठपुरावा करणार

Next
ठळक मुद्देएकस्तर वेतन श्रेणी लागू करा : जुनी पेंशन हक्क संघटनेच्या सभेत निर्धार

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : अंशकालीन पेंशन योजना लागू असलेल्या कर्मचाºयाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला शासनाकडून मदत व इतर शासकीय लाभ मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटना पाठपुरावा करेल, असा निर्णय बुधवारी पार पडलेल्या सभेत घेण्यात आला.
महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटना जिल्हा शाखा गडचिरोलीची जिल्हास्तरीय सहविचार सभा बुधवारी सकाळी ११ वाजता गडचिरोली येथील विश्रामगृहात पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अंकूश मैलारे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून महिला संघटिका वनश्री जाधव, जिल्हाध्यक्ष गुरूदेव नवघडे, जिल्हा सरचिटणीस बापू मुनघाटे, जिल्हा कोषाध्यक्ष विजय मुडपल्लीवार, मीडिया प्रमुख विठ्ठल होंडे आदी उपस्थित होते.
सभेला जिल्हाभरातील संघटनेच्या शेकडो पदाधिकारी व सदस्यांनी हजेरी लावली. सभेदरम्यान अहवालवाचन संघटनेचे सरचिटणीस बापू मुनघाटे यांनी केले. मागील सभेचे इतिवृत्त वाचून ते कायम करण्यात आले. एसबीआयने कर्मचाऱ्यांसाठी स्टेट गव्हर्नमेंट सॅलरी पॅकेज हे खाते सुरू केले आहे. यातून कर्मचाºयांना सर्वाेत्कृष्ट सुविधा मिळत असल्याने याच बँकेतून पगार करावे, यासाठी पाठपुरावा करण्याबाबत संघटनेचे उपाध्यक्ष अंकूश मैलारे यांनी मार्गदर्शन केले.
सातवा वेतन आयोग एकस्तर वेतनश्रेणीशिवाय लागू केल्यास मिळणारे वेतन हे जुन्या वेतनापेक्षाही कमी मिळते. त्यामुळे प्रत्येकाने चटोपाध्याय श्रेणी लागू करता येईल, यासाठी पाठपुरावा करण्याची आवश्यकता असल्याचे मत विठ्ठल होंडे यांनी व्यक्त केले. डीसीपीएस व एनपीएसधारक कर्मचाºयांसाठी स्वतंत्र सहकारी पतसंस्था स्थापनेविषयी जिल्हाध्यक्ष गुरूदेव नवघडे यांनी विचार मांडले.
संचालन गणेश आखाडे तर आभार अमित टेंभुर्णे यांनी मानले. सभेला कैलास कोरेटी, गणेश आखाडे, धनराज मोगरकर, तुळशीदास नरोटे, दीपक सुरपाम, प्रशांत ठेंगरे, कालिदास वट्टी, सुजीत दास, दीपक पुंगाटी, रामेश्वर गभणे, मुलचंद शिवणकर, नीकेश बन्सोड, सदाशिव कुमरे, प्रवीण धाडसे, अमित टेंभुर्णे, सुरेश चव्हाण, वृषाली कुंभारे, रत्नमाला सयाम, गणेश चौधरी, के. बी. हेमके, उमेश जेंगठे, छत्रपती शंकरवार, एम. एस. लांजेवार, जी. ए. राठोड, दुर्गादास कापकर, किसन सोनुले, एस. आर. दोहतरे, गुंफेश बिसेन, सचिन मेश्राम, जी. बी. वाघाडे, घोडमारे, आर. डी. कोवासे, सी. आर. वट्टी, टी. आर. नंदगिरवार आदी उपस्थित होते.

कपातीचा हिशेब मागणार
पेंशनसाठी कर्मचाºयांच्या वेतनातून काही रक्कम कपात केली जाते. मात्र कर्मचाºयाच्या पगारातून कपात झालेली रक्कम, त्यावरील व्याज, हिशेबाच्या पावत्या यांचा ताळमेळ जुळत नसल्याने कर्मचारी चिंतेत आहेत. त्यांचे लाखो रूपये बुडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा सर्व हिशेब मागण्यासाठी पाठपुरावा करण्याचे ठरविण्यात आले.
जिल्हा सामान्य रूग्णालयात रक्ताचा तुटवडा आहे. सामाजिक दृष्टीकोन लक्षात घेऊन लवकरच रक्तदान शिबिर आयोजित केले जाईल, असाही निर्णय घेण्यात आला.

Web Title: Follow-up to help the family of the deceased employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.