समस्यांचा पाठपुरावा करणार
By admin | Published: September 10, 2016 01:20 AM2016-09-10T01:20:17+5:302016-09-10T01:20:17+5:30
बुधवारच्या मध्यरात्री आरमोरी येथील मुख्य बाजारपेठेतील सराफा लाईनमधील दोन ज्वेलर्सचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी
आमदारांचे आश्वासन : सराफा व्यावसायिकांची आरमोरीत घेतली भेट
आरमोरी : बुधवारच्या मध्यरात्री आरमोरी येथील मुख्य बाजारपेठेतील सराफा लाईनमधील दोन ज्वेलर्सचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी २ लाख १६ हजार रूपये किंमतीचे सोने-चांदीचे दागिणे लंपास केले. या पार्श्वभूमीवर आमदार क्रिष्णा गजबे यांनी शुक्रवारी चोरी झालेल्या सराफा दुकानांना भेट देऊन सराफा व्यावसायिकांशी चर्चा केली व त्यांच्या समस्या जाणून घेत व्यावसायिकांच्या समस्या प्रशासनस्तरावर मांडून त्यांचा पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले.
आ. क्रिष्णा गजबे यांनी सुमंगल ज्वेलर्स, राजू बेहरे ज्वेलर्स, रॉयल पाईप हाऊस दुकानाला भेट दिली असता, आरमोरी शहरात सुरक्षा व्यवस्था सुरळीत करावी, अज्ञात चोरट्यांना तत्काळ अटक करावी, मार्केट, सराफा लाईनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावावे, पोलीस बंदोबस्त वाढविण्यासाठी पोलीस प्रशासनाला निर्देश द्यावे, आदी मागण्या आमदारांपुढे मांडल्या असता, आ. क्रिष्णा गजबे यांनी सदर समस्यांचा पाठपुरावा प्रशासनाकडे करण्याचे आश्वासन दिले. यावेळी सराफा असोसिएशनचे अध्यक्ष विजय खरवडे, उपाध्यक्ष दीपक बेहरे, प्रकाश बेहरे, अरूण हर्षे, सहसचिव पंकज खरवडे, भाजप तालुकाध्यक्ष नंदू पेट्टेवार, युवा नेते भारत बावनथडे, नंदू नाकतोडे, राजू बेहरे, विनोद बेहरे, युगल सामृतवार, स्वप्नील धात्रक, गोलू वाघरे, रोहित धकाते, राहुल तितीरमारे, सचिन बेहरे, अंकुश खरवडे, अमर खरवडे व पदाधिकारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
सराफा व्यावसायिक पोलीस अधीक्षकांना भेटणार
आरमोरी येथील सराफा व्यावसायिकांची दुकाने फोडून सोने-चांदीचे दागिणे लंपास करणाऱ्या चोरट्यांचा छडा लावण्याची मागणी करण्यासाठी सराफा असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसह आ. क्रिष्णा गजबे जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेणार आहेत. याशिवाय आ. क्रिष्णा गजबे यांनी पं. स. च्या वार्षिक आमसभेत आरमोरी शहरातील सुरक्षा व्यवस्था सुरळीत करण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना दिल्या.