क्षयमुक्तीसाठी कर्मचाऱ्यांनी रुग्णांपर्यत पाेहाेचावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2022 05:00 AM2022-03-27T05:00:00+5:302022-03-27T05:00:06+5:30

कार्यक्रमाला अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.साळुंखे, जिल्हा आराेग्य अधिकारी, डॉ. दावल साळवे, डॉ.नागदेवते, डॉ.मनिष मेश्राम, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.सचिन हेमके, डॉ.प्रफुल गोरे आदी मान्यवर उपस्थित होते. २४ मार्च राेजी जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील १३ क्षयरोग पथकांतर्गत विविध जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करून शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढून जनजागृती करण्यात आली.

For tuberculosis relief, the staff should look after the patients | क्षयमुक्तीसाठी कर्मचाऱ्यांनी रुग्णांपर्यत पाेहाेचावे

क्षयमुक्तीसाठी कर्मचाऱ्यांनी रुग्णांपर्यत पाेहाेचावे

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : क्षयरुग्णांचा शाेध घेऊन त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आराेग्य कर्मचाऱ्यांनी रुग्णांपर्यंत पाेहाेचावे, त्यांचा शाेध घ्यावा, असे आवाहन, जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ.अनिल रूडे यांनी केले. 
 जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था अंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये जागतिक क्षयरोग साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते मार्गदर्शन करीत हाेते. 
कार्यक्रमाला अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.साळुंखे, जिल्हा आराेग्य अधिकारी, डॉ. दावल साळवे, डॉ.नागदेवते, डॉ.मनिष मेश्राम, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.सचिन हेमके, डॉ.प्रफुल गोरे आदी मान्यवर उपस्थित होते. २४ मार्च राेजी जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील १३ क्षयरोग पथकांतर्गत विविध जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करून शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढून जनजागृती करण्यात आली.
प्रास्ताविक डॉ.सचिन हेमके यांनी केले. त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेमार्फत या वर्षी घोषित करण्यात आलेल्या ‘टीबी संपविण्यासाठी गुंतवणूक करा व जीव वाचवा’ या घोषवाक्याचे महत्त्व पटवून दिले. 
 संचालन गणेश खडसे व आभार ज्ञानदीप गलबले यांनी मानले. कार्यक्रमासाठी जिल्हा क्षयरोग कार्यालयातील अनिल चव्हान, राहुल रायपुरे, मनिष बोदेले, विनोद काळबांधे, विलास भैसारे, शरद गिऱ्हेपुंजे, प्रसन्नजीत कोटांगले, लता येवले, वंदना राऊत, लक्ष्मी नागेश्वर यांच्यासह जिल्हा सामान्य रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

क्षयराेग दिनदर्शिकेचे लाेकार्पण 
-    जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जिल्हा नियोजन समिती सभागृह गडचिरोली येथे आयोजित जिल्हास्तरीय आशा व गटप्रवर्तक पुरस्कार सोहळ्याच्या दरम्यान क्षयरोगावर मार्गदर्शन करून, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते क्षयरोग दिनदर्शिका व इतर जनजागृती साहित्यांचे लोकार्पण करण्यात आले.

Web Title: For tuberculosis relief, the staff should look after the patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य