अनियमित पाऊस होण्याचा अंदाज
By admin | Published: May 27, 2014 12:51 AM2014-05-27T00:51:19+5:302014-05-27T00:51:19+5:30
यावर्षीच्या पावसाळ्यात मागील वर्षी एवढा पाऊस पडणार नाही. त्याचबरोबर पाऊस अनियमित पडेल, असा अंदाज पंचांगकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. रोहणी नक्षत्राला २५ मे
वैरागड : यावर्षीच्या पावसाळ्यात मागील वर्षी एवढा पाऊस पडणार नाही. त्याचबरोबर पाऊस अनियमित पडेल, असा अंदाज पंचांगकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. रोहणी नक्षत्राला २५ मे पासून सुरूवात झाली आहे. त्यामुळे शेतकर्यांसह सर्वसामान्य नागरिक पावसाची आतुरतेने वाट पाहात आहे. साहजीकच शेतकरी वर्गाचे पाऊले आता पंचांगकर्त्यांकडे वळू लागली आहेत. त्यांच्याकडून वर्षभराच्या पावसाचा अंदाज घेतला जात आहे. मानापूर येथील रामभाऊ हस्तक व गणेश वझे या पंचांगकर्त्यांनी सांगितले की, रोहणी नक्षत्राचे वाहन उंदीर आहे. या नक्षत्र काळात आकाश अभ्राच्छादीत राहील. उकाळ्यात वाढ होईल, मात्र पाऊस पडण्याची शक्यता नसल्याचे सांगितले. मृगनक्षत्राला ८ जूनपासून सुरूवात होणार आहे. या नक्षत्राचे वाहन हत्ती असल्याने या नक्षत्रात ढगांचा गडगडाट आणि वीजा चमकून वादळ, वार्यासह पावसाला ८ जूनच्या दरम्यान सुरूवात होणार आहे. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत पर्जन्यमान कमी होण्याची शक्यता वर्तविली आहे. आद्रा नक्षत्र चांगल्या पावसाचा नक्षत्र म्हणून ओळखला जातो. काही ठिकाणी चांगला पाऊस पडेल. भात पिकासाठी मोठ्या प्रमाणात पावसाची गरज राहते. एवढ्या पावसासाठी शेतकर्याला प्रतीक्षा करावी लागणार आहे. पूनर्वसु हा नक्षत्र पावसाचा नक्षत्र म्हणून ओळखला जातो. या नक्षत्राचे वाहन गाढव आहे. या नक्षत्रात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पूर येऊन जीवित व आर्थिक हानी होईल. धानपट्ट्यात धान लागवडीला सुरूवात होईल. १५ आॅगस्टपर्यंत पर्जन्यवृष्टी कायम राहील. मघा, पूर्वा या नक्षत्रामध्ये अनियमित पाऊस राहणार आहे. अंतिम चरणातील हस्त, चित्रा व स्वाती या नक्षत्रांच्या काळातही पाऊस होण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. मृग नक्षत्रात ८ ते २० जूनपर्यंत पाऊस होण्याची शक्यता आहे. पूनर्वसु, पुष्प या नक्षत्र काळात अनियमित पाऊस पडेल. मागील वर्षीच्या पावसाळ्यात पंचांगकर्ते व वेधशाळेने वर्तविलेले अंदाज खोटे ठरवित प्रचंड पर्जन्यवृष्टी झाली होती. प्रारंभीचा रोहणी नक्षत्र वगळता सर्वच नक्षत्रांमध्ये शेवटपर्यंत पाऊस पडला होता. पावसाळ्याच्या पहिल्या महिन्यातच विदर्भातील सर्व तलाव, बोळ््या पाण्याने भरल्या होत्या. सततच्या पूर व पावसामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व आर्थिक हानी झाली होती. गडचिरोली जिल्ह्यात धान पिकाचे उत्पादन सर्वात जास्त घेतले जाते. या पिकासाठी अगदी सुरूवातीपासून तर धान पीक निघेपर्यंत मोठ्या प्रमाणात सिंचनाची गरज राहते. त्यामुळे जेवढा पाऊस अधिक तेवढे धान पिकाचे उत्पादन चांगले असा अंदाज शेतकरी वर्गाकडून व्यक्त केला जातो. मात्र पुरामुळे धान पीक कुजून उत्पादनात घट होते. जास्त पावसामुळे मात्र सोयाबिन, तूर, कापूस या पिकांना फटका बसण्याची शक्यता राहते. (वार्ताहर)