वन विभागाने स्वस्त दरात लाकडे पुरविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:37 AM2021-05-13T04:37:05+5:302021-05-13T04:37:05+5:30
त्यामुळे वन विभागाने स्वस्त दरात सरपणासाठी लाकडे पुरवावी, अशी मागणी हाेत आहे. सध्या इंधन दरवाढीचा फटका नागरिकांना बसत असल्याने ...
त्यामुळे वन विभागाने स्वस्त दरात सरपणासाठी लाकडे पुरवावी, अशी मागणी हाेत आहे. सध्या इंधन दरवाढीचा फटका नागरिकांना बसत असल्याने ग्रामीण भागातील महिला पुन्हा चुलीवर स्वयंपाक करीत आहेत. त्यातही सरपणाच्या लाकडांचा तुटवडा असल्याने अनेकजण गाेवऱ्यांचा वापर स्वयंपाक व पाणी गरम करण्यासाठी करतात. धावपळीच्या जीवनात मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरणाचा वापर हाेत आहे. शहरातील नागरिक विविध प्रकारची उपकरणे वापरताना दिसून येतात. त्यातच ग्रामीण भागातही अनेकजण नवीन उपकरणे वापरतात. ग्रामीण भागात आजही शेतकरीवर्ग गाय, म्हैस, शेळ्या पालन करून आपल्या कुटुंबांचा उदरनिर्वाह करीत आहेत. पाणी गरम करण्यासाठी इंधन म्हणून पूर्वीपासून लाकूड व शेणाच्या गोवऱ्यांचा वापर केला जात आहे. उन्हाळ्यातच नागरिक शेणापासून गोवऱ्या तयार करतात किंवा माेकळ्या जागेतून जमा करतात.