वनविभागाची शिकाऱ्यांवर करडी नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:28 AM2021-05-30T04:28:18+5:302021-05-30T04:28:18+5:30
मार्च, एप्रिल महिन्यात जंगलांना लागणाऱ्या आगीत काही वन्यजीव होरपळून मरून जातात. तेंदू हंगामात प्राण्यांचा वावर असणाऱ्या जंगलात मानवी हस्तक्षेपामुळे ...
मार्च, एप्रिल महिन्यात जंगलांना लागणाऱ्या आगीत काही वन्यजीव होरपळून मरून जातात. तेंदू हंगामात प्राण्यांचा वावर असणाऱ्या जंगलात मानवी हस्तक्षेपामुळे वन्य प्राणी आणि मानव संघर्ष झाल्याच्या घटना या वर्षात घडल्या आहेत. मागील १५ दिवसांपासून वाढलेले तापमान आणि जंगलातील पाणवठे आठल्याने वन्यजीव लोकवस्तीकडे धाव घेत आहेत.
वैरागड जवळील गावतलाव, पाटणवाडा तलाव, शिवनीबांध, डोंगरतमाशी जवळील तलाव मेंढा येथील पाण्याची टाकी म्हणून ओळखल्या जाणारा गाव तलाव या ठिकाणी रात्रीच्या वेळी वन्यजीव आपली तहान भागवण्यासाठी येतात. काही लोकांकडून शिकारी हाेण्याची शक्यता राहते.
वैरागडचे क्षेत्र सहाय्यक एस. जी. सोनुले, वनरक्षक विकास शिवणकर, विनोद कवडो, नारायण शिवरकर, जी. एस. धात्रक यांनी वन्यजीवांची शिकार होऊ नये यासाठी करडी नजर ठेवली आहे.
कोट
कोरोना संसर्गामुळे या वर्षात मानवी कृत्रिम पाणवठे तयार केलेे नाहीत. वन्यप्राण्यांचा वावर असलेल्या क्षेत्रात जुने पाणवठे आहेत. त्यावर वन्यजीव तहान भागवीत आहेत. वन्यजीवांना शिकारीपासून धोका होऊ नये म्हणून छुप्या कॅमेराद्वारे वनविभाग लक्ष ठेवून आहे.
सचिन डोंगरवार,
वनपरिक्षेत्र अधिकारी, आरमोरी