वन विभागाच्या गस्ती पथकाने केले लाखो रुपयांचे अवैध सागवान जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2022 05:00 AM2022-04-28T05:00:00+5:302022-04-28T05:00:48+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क आलापल्ली/पेरमिली : आलापल्ली वन विभागांतर्गत येत असलेल्या पिरमिली वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक ९२ मध्ये अवैधरीत्या वाहतूक होत ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
आलापल्ली/पेरमिली : आलापल्ली वन विभागांतर्गत येत असलेल्या पिरमिली वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक ९२ मध्ये अवैधरीत्या वाहतूक होत असलेली सागवान लाकडे वन विभागाच्या गस्ती पथकाने रंगेहाथ पकडले. यात ३३ नग लाकडांसह ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त करण्यात आली. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत १० लाखाच्या घरात आहे.
प्राप्त माहितीनुसार, दिनांक २६ च्या सायंकाळी ७.१५ वाजता गस्तीवर असलेल्या पिरमिली वनपरिक्षेत्रातील अधिकारी व त्यांच्या अधिनस्त क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना अवैधरीत्या लाकूड भरून वाहतूक करीत असलेले ट्रॅक्टर आढळले. या प्रकरणात आरोपी प्रभाकर बोंदय्या जंगीडवार (४५ वर्षे) रा. पिरमिली व रोशन संपत गावडे (२५ वर्ष) रा. पिरमिली यांना ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई गडचिरोली वनवृत्ताचे वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर व आलापल्ली वन विभागाचे उपवनसंरक्षक राहुलसिंग टोलिया यांच्या मार्गदर्शनात नीतेश शंकर देवगडे, उपविभागीय वनाधिकारी आलापल्ली, योगेश वसंत शेरेकर वनपरिक्षेत्र अधिकारी पिरमिली, क्षेत्र सहायक मंगरू कोलू तिम्मा, केशव सावजी तुलावी, वसंत चिन्नाजी पागे, आजमखान महेबूबखान पठाण, नियत वनरक्षक देवीदास देवराव मेश्राम, रवींद्र घाटूजी येरेवार, अविनाश कोडापे, विनोद आत्राम, प्रेमानंद कोकोडे, महेश जीवन मेश्राम, सुरेद्र बंदुके, नजीमखान पठाण, वनमजूर चरणदास गर्गम, शंकर आतकुलवार, वाहन चालक सचिन डांगरे यांनी पार पाडली. या कारवाईमुळे वनतस्करांवर वचक बसला आहे.