वन विभागाने अतिक्रमण हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2017 01:40 AM2017-06-21T01:40:35+5:302017-06-21T01:40:35+5:30

तालुक्यातील गोमणी बिटाअंतर्गत येत असलेल्या हरिनगर येथील सर्वे क्र. १०३ मधील ७ हेक्टर

Forest Department removed encroachment | वन विभागाने अतिक्रमण हटविले

वन विभागाने अतिक्रमण हटविले

googlenewsNext

हरीनगर येथील कारवाई : दोन सबमर्सिबल मशीन व पाईप जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
मुलचेरा : तालुक्यातील गोमणी बिटाअंतर्गत येत असलेल्या हरिनगर येथील सर्वे क्र. १०३ मधील ७ हेक्टर जागेवर अतिक्रमण करून शेती केली जात असल्याची माहिती वन विभागाला माहीत झाल्यानंतर वन विभागाने मोकाचौकशी करून अतिक्रमण हटविले आहे.
हरिनगर येथील लक्ष्मीकांत नकूल मंडल याने ७ हेक्टर जागेवर अतिक्रमण केले होते. या जागेवर बोअरचे खोदकाम केले होते. अतिक्रमीत जागा असताना वीज विभागाने विद्युत पुरवठा केला होता. लक्ष्मीकांत मंडल हा मागील दहा वर्षांपासून अतिक्रमण करून शेती करीत होता. याबाबतची तक्रार गावातील काही नागरिकांनी वन विभागाकडे केल्यानंतर वन विभागाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी मोकाचौकशी करून मापन केले असता, मंडल याने अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली.
सदर कारवाई आलापल्ली वन विभागाचे प्रकाष्ठ निस्कान अधिकारी पचारे यांच्या मार्गदर्शनात पेडिगुंडमचे वनपरिक्षेत्राधिकारी व्ही. व्ही. मेडेवार, क्षेत्रसहायक सिडाम, क्षेत्रसहाय लटारे, मिसरी, नरूले यांच्या पथकाने केले. अतिक्रमण हटविण्याकरिता मुलचेरा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक पाठक, पोलीस उपनिरीक्षक भगत व त्यांच्या चमूने पूर्णवेळ राहून सहकार्य केले. जागेवरून दोन सबमर्शिबल मशीन व पाईप जप्त करण्यात आल्या आहेत. वन विभागाच्या जागेवर कुणी अतिक्रमण करीत असल्यास याबाबतची माहिती स्थानिक नागरिकांनी वन विभागाला द्यावी, सदर अतिक्रमणधारकावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
पेडिगुंडम वन परिक्षेत्राअंतर्गत यापूर्वीही अतिक्रमण हटविण्याच्या कारवाया करण्यात आल्या आहेत. अवैध अतिक्रमण हटविले जात असल्याने अतिक्रमणधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरीही काही जणांनी अजूनही अतिक्रमण करून जागा बळकावली आहे.

Web Title: Forest Department removed encroachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.