वन विभागाने हटविले अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 10:36 PM2018-03-22T22:36:16+5:302018-03-22T22:36:16+5:30
धानोरा वन परिक्षेत्र कार्यालयाच्या हद्दीतील दुधमाळा क्षेत्रातील फासीटोला येथील वन जमिनीवर गेल्या पाच वर्षापासून १६ नागरिकांचे अतिक्रम कायम होते.
ऑनलाईन लोकमत
धानोरा : धानोरा वन परिक्षेत्र कार्यालयाच्या हद्दीतील दुधमाळा क्षेत्रातील फासीटोला येथील वन जमिनीवर गेल्या पाच वर्षापासून १६ नागरिकांचे अतिक्रम कायम होते. वनाधिकाऱ्यांनी ठोस निर्णय घेऊन गुरूवारी जेसीबी व ट्रॅक्टरच्या सहाय्याने या वन जमिनीवर अतिक्रमण काढले.
१६ नागरिकांनी फासीटोला येथील १३.८९ हेक्टर वन जमिनीवर अतिक्रमण केले होते. गडचिरोलीचे सहायक वनसंरक्षक मुक्ता टेकाडे, सहायक वनसंरक्षक सोनल भडके, धानोराचे वन परिक्षेत्राधिकारी रवींद्र चौधरी, चातगावचे वन परिक्षेत्राधिकारी प्रभाकर सोनडवले, गस्ती पथकाचे वन परिक्षेत्राधिकारी दिलीप होकम, पेंढरीचे वन परिक्षेत्राधिकारी मेश्राम, महेश शिवे आदीसह वन कर्मचाºयांनी फासीटोला गाठले. तेथील वन जमिनीवरील अतिक्रमण हटविले. यावेळी धानोरा, चातगाव, पेंढरी वन परिक्षेत्रातील तसेच गस्ती पथकातील वनपाल, वनरक्षक उपस्थित होते. सदर कारवाई गुरूवारी सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंत करण्यात आली.