नागरिकांच्या माहितीवरून वाघ शाेधतांना वनविभागाची दमछाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:42 AM2021-09-15T04:42:38+5:302021-09-15T04:42:38+5:30
साेमवारी पहाटे फिरायला गेलेल्या काही महिलांना आलापल्ली-सिरोंचा मुख्य मार्गावर मल्लमपल्ली नर्सरीजवळ वाघ बघितल्याची चर्चा होती. कुणीतरी वनविभागाला याबाबत माहिती ...
साेमवारी पहाटे फिरायला गेलेल्या काही महिलांना आलापल्ली-सिरोंचा मुख्य मार्गावर मल्लमपल्ली नर्सरीजवळ वाघ बघितल्याची चर्चा होती. कुणीतरी वनविभागाला याबाबत माहिती दिली असता वनविभागाने दिवसभर शोधमोहीम राबविली. वनविभागाला कुठेही वाघ किंवा त्याचे फूट प्रिंट आढळले नाही. तसेच साेमवारी रात्री ९ च्या दरम्यान पंचायत समिती अहेरी आणि पोलीस स्टेशनच्या जवळ वाघ आढळून आल्याची माहिती नागरिकांनी वनविभागाला दिली.
अहेरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी आरती मडावी, आलापल्ली वनपरीक्षेत्र अधिकारी योगेश शेरेकर आणि फिरत्या वनपथकाच्या कर्मचाऱ्यांनी रात्रभर गस्त केली. मात्र, मंगळवारी दिवसभर कुठेही पगमार्क मिळाले नाही. नागरिकांनी सावधानता बाळगावी, रात्री उशिरापर्यंत, नाल्याशेजारी एकटे दुकटे फिरू नये, पहाटे फिरायला जाणाऱ्या लोकांनी गावाच्या बाहेर जंगलात जास्त दूर जाऊ नये, असे आवाहन वनविभागाने केले आहे.