वन विभागाची निवासस्थाने जीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2016 02:12 AM2016-10-17T02:12:49+5:302016-10-17T02:12:49+5:30

धानोरा तालुक्यातील क्रमांक १ मौजा मुरूमगाव हा सर्वात मोठे वनपरिक्षेत्र कार्यालय आहे. मात्र या कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या निवासस्थांनाची दुरवस्था झाली आहे.

Forest department's home is cold | वन विभागाची निवासस्थाने जीर्ण

वन विभागाची निवासस्थाने जीर्ण

Next

दुरूस्तीची मागणी : मुरूमगाव वनपरिक्षेत्रातील स्थिती
मुरूमगाव : धानोरा तालुक्यातील क्रमांक १ मौजा मुरूमगाव हा सर्वात मोठे वनपरिक्षेत्र कार्यालय आहे. मात्र या कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या निवासस्थांनाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे निवासस्थानांमध्ये एकही कर्मचारी राहत नाही.
मुरूमगाव क्रमांक १ वनपरिक्षेत्र कार्यालयाचा विस्तार फार मोठा आहे. सुरसुंडीपासून येरकड, सावरगावपासून गॅरापत्तीपर्यंत या वनपरिक्षेत्राचा विस्तार आहे. १० क्षेत्र सहायक व ३० ते ४० बिडगार्ड आहेत. प्रत्येक बिडगार्डला सरकारने एक निवासस्थान बांधून दिला आहे. मात्र या निवासस्थानांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे एकही कर्मचारी निवासस्थांनामध्ये राहत नाही. बहुतांश निवासस्थाने कवेलूची आहेत. या निवासस्थानांची मागील अनेक वर्षांपासून डागडुजी करण्यात आली नाही. त्यामुळे सदर निवासस्थाने जीर्णावस्थेत पोहोचली आहेत.
निवासस्थान उपलब्ध नसल्याने काही वनकर्मचारी मुख्यालयी सुद्धा राहत नाही. त्यामुळे वनांच्या संरक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे. नवीन निवासस्थाने बांधून देण्यात यावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत असली तरी याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Forest department's home is cold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.