ठिकठिकाणचे जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 12:16 AM2019-03-28T00:16:23+5:302019-03-28T00:17:14+5:30
वनसंपत्तीने नटलेल्या या जिल्ह्यात यावर्षी वणवे पेटण्याच्या सर्वाधिक म्हणजे ३०० घटना घडल्या आहेत. त्या आगींवर नियंत्रण मिळवताना वनविभागाला मोठी कसरत करावी लागत आहे. दुर्गम भागातील अनेक ठिकाणच्या जंगलात तर वनकर्मचाऱ्यांना आग विझविण्यासाठी पोहोचणेही कठीण झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : वनसंपत्तीने नटलेल्या या जिल्ह्यात यावर्षी वणवे पेटण्याच्या सर्वाधिक म्हणजे ३०० घटना घडल्या आहेत. त्या आगींवर नियंत्रण मिळवताना वनविभागाला मोठी कसरत करावी लागत आहे. दुर्गम भागातील अनेक ठिकाणच्या जंगलात तर वनकर्मचाऱ्यांना आग विझविण्यासाठी पोहोचणेही कठीण झाले आहे. मोहफूल आणि तेंदूपत्त्याच्या हंगामासाठी लावल्या जाणाऱ्या या आगींमुळे वनसंपदेला हाणी पोहोचण्यासोबतच सरपटणारे प्राणी आणि वन्यजीवांना प्राणास मुकावे लागत आहे.
जिल्ह्याच्या भौगोलिक प्रदेशापैक ७६ टक्के भाग जंगलाने व्यापलेला आहे. दरवर्षी मार्च महिन्यानंतर जंगलात वणवे लागायचे. परंतु यावर्षी मार्च महिन्याच्या सुरूवातीपासूनच मोहफूल हंगामाला सुरूवात झाली. मोहफूल गोळा करणारे नागरिक झाडाखालील जागा स्वच्छ करून पालापाचोळा जमा करून जाळत आहेत. मोहाची झाडे भरपूर प्रमाणात असलेल्या भागात आगीचे प्रमाण जास्त दिसत आहे. तसेच तेंदूपत्ता संकलन करणाऱ्यांकडूनही फुटवे तोडून लगतचे जंगल साफ करण्यासाठी तो त्या भागाला आगी लावल्या जातात. ही आग पसरत जाऊन शेकडो हेक्टर जंगलाला कवेत घेते.
वनविभागाने यावर्षी १ ते ७ फेब्रुवारीदरम्यान गावोगावी जनजागृती करून आगी न लावण्याचे आवाहन करण्यात आले. पण त्याचा फारसा फरक पडला नाही. आगींचे प्रमाण पाहता उपाययोजनांसाठी निधीची गरज असून जिल्हा आपत्ती निवारणाच्या निधीतून यासाठी निधी मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. वनरक्षकांकडे फायर ब्लोअर देण्यात आले आहेत.
- तर अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई
यावर्षी इतक्या मोठ्या प्रमाणात वणने का लागत आहेत याचे कारण शोधण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाºयांनी दिले आहेत. त्यासाठी फायर आॅडिट केले जाणार आहे. वणव्याबाबत सॅटेलाईट संदेश मिळाल्यानंतर तातडीने वणवा विझविण्याकडे, आगी लावणाºयांवर कारवाई करण्याकडे संबंधित क्षेत्रातील वनअधिकारी-कर्मचाºयांनी दुर्लक्ष केल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यााचा प्रस्ताव जाणार आहे.