वादळानंतर डोक्यावर मरण घेऊन राहताहेत वन कर्मचारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 10:55 PM2018-05-21T22:55:18+5:302018-05-21T22:55:45+5:30
आलापल्ली येथे झालेल्या वादळामुळे वन विभागाच्या अनेक निवासस्थानांवरील छप्पर व टिन उडून गेले. मात्र या घटनेला सहा दिवसांचा कालावधी उलटूनही वन विभागाने निवासस्थाने दुरूस्तीच्या कामाला सुरूवात केली नाही. निवासस्थानांवर ताडपत्री झाकून आश्रय घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आलापल्ली : आलापल्ली येथे झालेल्या वादळामुळे वन विभागाच्या अनेक निवासस्थानांवरील छप्पर व टिन उडून गेले. मात्र या घटनेला सहा दिवसांचा कालावधी उलटूनही वन विभागाने निवासस्थाने दुरूस्तीच्या कामाला सुरूवात केली नाही. निवासस्थानांवर ताडपत्री झाकून आश्रय घेतला आहे.
आलापल्लीसह परिसराला १६ मे रोजी वादळाचा जोरदार तडाखा बसला होता. या वादळामुळे अनेकांच्या घरावरील छत उडून गेले. या वादळाचा सर्वाधिक फटका वन विभागाच्या वसाहतीला बसला. वन विभागाच्या वसाहतीतील बहुतांश घरे टिनाची आहेत. १६ मे रोजी झालेल्या वादळात जवळपास २० निवासस्थानांवरील छतासह टिन उडून गेले. त्यामुळे घर पूर्णपणे उघडे पडले. दुसऱ्याच दिवशी मुख्य वनसंरक्षक येटबॉन, आलापल्ली वन विभागाचे उपवनसंरक्षक सी. आर. तांबे, उपविभागीय वनाधिकारी रवी अग्रवाल, सहायक उपवनसंरक्षक एच. जी. मडावी, आलापल्लीचे वन परिक्षेत्राधिकारी किरण पाटील यांनी वसाहतीला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. मुख्य वनसंरक्षकांनी निवासस्थाने तत्काळ दुरूस्त करण्याचे निर्देश दिले. मात्र आता सहा दिवसांचा कालावधी उलटूनही घरांच्या दुरूस्तीला सुरूवात झाली नाही. ऊन, वारा, पाऊस यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी काही वन कर्मचाºयांनी तात्पुरती ताडपत्री झाकली आहे. मात्र दिवसा प्रचंड उन्हाचा त्रास वनकर्मचाºयांच्या कुटुंबियांना सहन करावा लागत आहे. पावसाळ्याचे दिवस जवळ आले आहेत. त्यामुळे वादळी वाºयासह पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाऊस झाल्यास झोपण्याचा व राहण्याचा प्रश्न कुटुंबासमोर निर्माण झाला आहे. त्याचबरोबर घरातील संपूर्ण साहित्य भिजण्याची शक्यता आहे.
दिवसभराच्या उन्हामुळे वनकर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांची प्रकृती बिघडत आहे. त्यांना उष्माघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वादळ झाल्यास सदर ताडपत्री कधीही उडून जाऊ शकते. पाऊस झाल्यास मोठे नुकसान होणार असल्याने वन कर्मचाºयांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुख्य वनसंरक्षकांनी या गंभीर बाबीकडे स्वत: लक्ष घालून निवासस्थानांची दुरूस्ती करून द्यावी, अशी मागणी होत आहे.