पालिकेवरील कर्ज माफ करा

By admin | Published: April 22, 2017 01:21 AM2017-04-22T01:21:32+5:302017-04-22T01:21:32+5:30

गडचिरोली नगर परिषदेने वाढीव पाणी पुरवठा योजनेकरीता घेतलेले कर्ज, त्यावरील व्याज, दंडनिय व्याज तसेच हमी शुल्क

Forgive the loan on the corporation | पालिकेवरील कर्ज माफ करा

पालिकेवरील कर्ज माफ करा

Next

गडचिरोली न.पं.ची सभा : सर्वसाधारण सभेत ठराव पारित
गडचिरोली : गडचिरोली नगर परिषदेने वाढीव पाणी पुरवठा योजनेकरीता घेतलेले कर्ज, त्यावरील व्याज, दंडनिय व्याज तसेच हमी शुल्क नगर परिषदेच्या आर्थिक परिस्थितीमुळे भरणा करणे शक्य नाही. त्यामुळे सदर कर्ज माफ करण्यात यावे, अशा शिफारशीचा ठराव शुक्रवारी झालेल्या नगर पालिकेच्या सर्वधारण सभेत पारित करण्यात आला. हा ठराव राज्य सरकारकडे पाठविला जाणार असल्याची माहिती नगराध्यक्ष योगीता पिपरे यांनी दिली.
भारतीय जनता पार्टीची गडचिरोली पालिकेवर एकहाती सत्ता प्रस्तापित झाल्यानंतर पालिकेची पहिली सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष योगीता पिपरे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी त्यांच्या दालनात पार पडली. या सभेत जीवन प्राधिकरणास शहराच्या मल निस्सारण प्रकल्प व्यवस्थापकाला सल्लागार न करता खासगी सल्लागार कोकणे यांची व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यास मंजुरी देण्यात आली. याशिवाय विविध ठराव पारित करण्यात आले.
यावेळी सभेला न.प. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, बांधकाम सभापती आनंद श्रुंगारपवार, पाणी पुरवठा सभापती केशव निंबोळ, शिक्षण सभापती अ‍ॅड. नितीन उंदीरवाडे, स्वीकृत सदस्य प्रमोद पिपरे, रमेश भुरसे, नंदकिशोर काबरा, महिला व बाल कल्याण सभापती अल्का पोहणकर, मुख्याधिकारी कृष्णा निपाने, नगरसेवक सतीश विधाते, संजय मेश्राम, भुपेश कुळमेथे, प्रशांत खोब्रागडे, माधुरी खोब्रागडे यांच्यासह बहुसंख्य नगरसेवक उपस्थित होते.
या सर्वसाधारण सभेत चंद्रपूर मार्गावरील नगर परिषदेच्या जुन्या कार्यालयाच्या जागेवर बांधण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालय पे एन्ड यूज तत्वावर हस्तांतरीत करण्याची मंजुरी देण्यात आली. शहरात जिल्हा क्रीडा संकूल उभारण्यासाठी पालिकेची काहीच हरकत नसल्याचा ठराव पारित करण्यात आला. पालिका क्षेत्रातील नवीन वस्ती व इतर ठिकाणी आवश्यकतेनुसार नवीन वीज खांब उभारून त्यावर स्ट्रिट लाईट लावण्याचा निर्णय घेण्यात आला. पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना आगामी सत्र २०१७-१८ मध्ये शुज, सॉक्स व स्कुल बॅग खरेदी करून पुरवठा करण्याचा ठराव पारित करण्यात आला. याशिवाय शहरातील विविध विकासकामांवर चर्चा करण्यात आली.

Web Title: Forgive the loan on the corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.