माजी जि. प. सदस्याच्या कारने घेतला पेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:35 AM2021-03-28T04:35:01+5:302021-03-28T04:35:01+5:30

आरमोरी येथील माजी जिल्हा परिषद सदस्य अमोल मारकवार यांच्या मालकीची असलेली टाटा इंडिगो एम. एच. ३३ ऐ ३२१८ या ...

Former Dist. W. The member's car took the stomach | माजी जि. प. सदस्याच्या कारने घेतला पेट

माजी जि. प. सदस्याच्या कारने घेतला पेट

Next

आरमोरी येथील माजी जिल्हा परिषद सदस्य अमोल मारकवार यांच्या मालकीची असलेली टाटा इंडिगो एम. एच. ३३ ऐ ३२१८ या क्रमांकाची कार स्वतः मारकवार चालवीत होते. पाण्याची बाटली घेण्यासाठी मारकवार यांनी तहसील कार्यालयासमोर रस्त्याच्या कडेला कार उभी करून समोरच्या हॉटेलमध्ये गेले असता त्यांच्या पाठीमागे कारने पेट घेतला.

दरम्यान, महावितरणच्या कार्यालयात आयोजित शिवसेनेच्या वतीने आंदोलन आटोपून परत येत असताना माजी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल व माजी नगराध्यक्ष डॉ. महेन्द्र कुमार मोहबंसी यांना कारच्या इंजिनच्या भागातून पेट घेत असल्याचे लक्षात आले. त्यांनी कार्यकर्त्यांसोबत समोरच्या हॉटेलमधून बादलीने पाणी घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु कार दुसऱ्या बाजूने पेट घेत होती. माजी नगरसेवक ॲड. उमेश वालदे व शिवसेना कार्यकर्ते आशीष काळे यानी भ्रमनध्वनीवर पोलीस व नगरपंचायत प्रशासनाला सूचना केली. लगेच नगरपंचायतीचे अग्निशामक वाहन घटनास्थळावर दाखल झाले व बऱ्याच प्रयत्नानंतर आग विझवण्यात आली. यावेळी आंदोलनाच्या बंदोबस्तावर असलेले कुरखेडा पोलिस पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुधाकर देडे, उपनिरीक्षक नारायण शिंदे, यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून बघ्यांना घटनास्थळापासून दूर सारून कुरखेडा तळेगाव मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू केली.

Web Title: Former Dist. W. The member's car took the stomach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.