आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे सुसुत्रीकरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 05:00 AM2020-10-21T05:00:00+5:302020-10-21T05:00:30+5:30

निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत प्रयोगशाळा तंत्रज्ञ व जिल्हा व्हीबीडी सल्लागार या पदांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. परंतु मलेरिया तांत्रिक पर्यवेक्षक पदाचा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला नाही. तांत्रिक पर्यवेक्षक पदाचा स्पष्ट उल्लेख न केल्यामुळे या पदाचे वेतन सुसुत्रीकरण करण्यात अडचण निर्माण होत आहे. मलेरिया तांत्रिक पर्यवेक्षक हे पद सुपरवायझर या कॅडरमध्ये येत असल्याने या पदाचे कार्य तालुकास्तरीय पर्यवेक्षणाचे आहे. या पदासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता बीएससी पदवी आहे.

Formulate the salaries of health workers | आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे सुसुत्रीकरण करा

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे सुसुत्रीकरण करा

googlenewsNext
ठळक मुद्देसंघटनेचे शिष्टमंडळ सीईओ व डीएमओला भेटले : मलेरिया तांत्रिक पर्यवेक्षक पदाचा उल्लेख नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत शिक्षण, अनुभव व समान पदावर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुसुत्रीकरण करण्याची तरतूद आहे. मात्र आरोग्य अधिकारी व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पदाचे व वेतनाचे सुसुत्रीकरण करण्यात आले नाही. त्यामुळे व्हीबीडी सल्लागार व मलेरिया तांत्रिक पर्यवेक्षकांवर अन्याय होत आहे. सुसुत्रीकरण करून अन्याय दूर करावा, अशी मागणी अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात संघटनेचे शिष्टमंडळ, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद व जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.कुणाल नंदेश्वर यांची भेट घेऊन त्यांना मंगळवारी निवेदन दिले.
निवेदन देताना व्हीबीडी सल्लागार राजेश कार्लेकर, मलेरिया तांत्रिक पर्यवेक्षक प्रशांत खोब्रागडे, वितराज कुनघाडकर, भारती मडावी, संकेत येगोलपवार, धनश्री चंद्रगीरे, पवन दरडे, अनिल शंखावार, प्रदीप चलाख, महेश बोेल्ले, आरती कोरेत, ओमप्रकाश भांडारकर, सचिन मडावी, नवीनकुमार जनमवार आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत प्रयोगशाळा तंत्रज्ञ व जिल्हा व्हीबीडी सल्लागार या पदांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. परंतु मलेरिया तांत्रिक पर्यवेक्षक पदाचा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला नाही. तांत्रिक पर्यवेक्षक पदाचा स्पष्ट उल्लेख न केल्यामुळे या पदाचे वेतन सुसुत्रीकरण करण्यात अडचण निर्माण होत आहे. मलेरिया तांत्रिक पर्यवेक्षक हे पद सुपरवायझर या कॅडरमध्ये येत असल्याने या पदाचे कार्य तालुकास्तरीय पर्यवेक्षणाचे आहे. या पदासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता बीएससी पदवी आहे.
तांत्रिक पर्यवेक्षक पदाला सुद्धा सुपरवायझर या कॅडरमध्ये समाविष्ट करावे, जेणेकरून या पदाच्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही. आम्ही सर्व अधिकारी, कर्मचारी गेल्या १० वर्षांपासून तुटपुंज्या मानधनावर काम करीत आहोत. वेतन सुसुत्रीकरण करून मानधनात वाढ करावी, अशी मागणी केली आहे. जुने अधिकारी व कर्मचाऱ्यांना सरसकट २० ते २५ टक्के मानधनवाढ लागू करावी, अशी मागणी आहे.

Web Title: Formulate the salaries of health workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य