एटापल्ली तालुक्यात नक्षल्यांच्याविरूद्ध पत्रक आढळले
By admin | Published: February 15, 2017 01:35 AM2017-02-15T01:35:27+5:302017-02-15T01:35:27+5:30
एटापल्लीपासून एक किमी अंतरावर पंदेवाही फाटा ते तुमरगुंडा मार्गावर नक्षलवाद्यांच्या विरूध्द पत्रक सोमवारच्या मध्यरात्री टाकण्यात आले.
एटापल्ली : एटापल्लीपासून एक किमी अंतरावर पंदेवाही फाटा ते तुमरगुंडा मार्गावर नक्षलवाद्यांच्या विरूध्द पत्रक सोमवारच्या मध्यरात्री टाकण्यात आले. या पत्रकात जिल्हा परिषद निवडणुकीत मतदान करून लोकशाही मजबूत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच नक्षलवाद्यांकडून करण्यात येणाऱ्या हत्यांचा विरोध करा. आदिवासीच्या नावावर होणारी पैसेवसुली बंद करून हिंसा थांबवा, आदिवासींचे शोषण बंद करा, रस्ते, पूल, मोबाईल टॉवर, उद्योगाद्वारा रोजगार निर्मिती व विकास यांना वाढविण्यासाठी प्रयत्न करा, नक्षल्यांना साथ देणाऱ्या स्वयंसेवी संघटना व सामाजिक कार्याचा बुरखा पांघरून कार्य करणाऱ्या व आदिवासींची दिशाभूल करणाऱ्यांना हाकलून लावा, आदिवासींच्या विकासासाठी सरकारला साथ द्या, असा उल्लेख करण्यात आला आहे. माओवादी क्रांती मुर्दाबाद, संविधान जिंदाबाद, असे नमूद करून पत्रकावर आदिवासी जोहार, असे लिहिण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)
जिमलगट्टाजवळ नक्षली बॅनर व पत्रक आढळले
जिमलगट्टा ते देचलीपेठादरम्यान जिमलगट्टापासून दोन किमी अंतरावर नक्षल पत्रके व कापडी बॅनर मुख्य रस्त्यावर आढळून आले आहे. या पत्रकात जि.प. निवडणुकीत बहिष्कार टाकण्यात यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.