चामोर्शीतील तलावात आढळला मगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 10:28 PM2019-06-14T22:28:08+5:302019-06-14T22:29:21+5:30
येथील पोलीस स्टेशनच्या शेजारी असलेल्या गाव तलावात दोन दिवसांपूर्वी मगर दिसून आला. या मगराला पकडण्यासाठी वन विभागाच्या चमुने शोधमोहीम हाती घेतली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : येथील पोलीस स्टेशनच्या शेजारी असलेल्या गाव तलावात दोन दिवसांपूर्वी मगर दिसून आला. या मगराला पकडण्यासाठी वन विभागाच्या चमुने शोधमोहीम हाती घेतली आहे.
चामोर्शीतील काही नागरिकांना मगर दिसून आला. याबाबतची माहिती नागरिकांनी वन विभागाला दिली. वन विभागाच्या पथकाने शोधमोहीम सुरू केली आहे. तलावात इकर्निया नावाची वनस्पती मोठ्या प्रमाणात आहे. या वनस्पतीने संपूर्ण तलाव आच्छादून गेले आहे. त्यामुळे मगराचा शोध घेताना अडचण जात आहे. सदर मगर जवळपास चार ते पाच फुटाचा असावा, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
मगरामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून मगराचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. प्रभारी वन परिक्षेत्राधिकारी सुधीर सुरपाम यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहायक आर. डी. तोकला, प्रभाकर अनकरी, आर. एम. नरूले, वनरक्षक जे. टी. निमसरकार, आलापल्ली संरक्षण पथकाचे अधिकारी एस. एस. आत्राम यांच्या मार्गदर्शनात वन कर्मचारी मगराचा शोध घेत आहेत.