शिकारीसाठी जंगलात करंट लावणाऱ्या चार आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:37 AM2021-04-24T04:37:42+5:302021-04-24T04:37:42+5:30

चामोर्शी : चामोर्शी वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या जामगिरी उपक्षेत्रातील नारायणपूर-१ मधील संरक्षित जंगल परिसरात करंट लावून शिकार करण्याचा प्रयत्न ...

Four accused arrested for electrocuting poachers | शिकारीसाठी जंगलात करंट लावणाऱ्या चार आरोपींना अटक

शिकारीसाठी जंगलात करंट लावणाऱ्या चार आरोपींना अटक

Next

चामोर्शी : चामोर्शी वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या जामगिरी उपक्षेत्रातील नारायणपूर-१ मधील संरक्षित जंगल परिसरात करंट लावून शिकार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार आरोपींना वनविभागाच्या पथकाने अटक केली. त्यांनी शिकारीसाठी करंट लावून ठेवल्याची कबुलीही दिली.

गोलक गोपाल मंडल, गुरुपद हरीपद अधिकारी, दोघेही रा. विष्णूपूर, दिलीप जगन्नाथ गोडबोले आणि उद्धव भोगाजी गोडबोले, दोघेही रा.जामगिरी, तालुका चामोर्शी अशी आरोपींची नावे आहेत.

प्राप्त माहितीनुसार, सदर जंगल क्षेत्रात शिकारीच्या दृष्टीने अवैधरीत्या विद्युत करंट पसरवून ठेवल्याने त्याचा स्पर्श होऊन एक बैल ठार झाला. त्याची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण लेले यांच्या मार्गदर्शनाखाली जामगिरी उपक्षेत्रातील वनकर्मचाऱ्यांचे गस्ती पथक आणि महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळापासून दीड ते दोन किलोमीटर लोखंडी बारीक तार पसरवून ठेवलेली आढळून आली.

त्यानुसार जंगल परिसरात फिरून आरोपीचा शोध घेतला असता

वरील चारही आरोपी गवसले. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर न्यायालयीन कोठडी मिळाली. या घटनेचा पुढील तपास उपवनसंरक्षक सी.आर. तांबे, सहायक वनसंरक्षक एस.पी. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण लेले यांच्या नेतृत्वात क्षेत्रसहायक पी. के. भडांगे, आर. एम. गुरनुले, एम. पी. मुनघाटे, वनरक्षक एन.बी. गावडे, डी. एम. कुमरे, आर.आर. वासेकर, आनंद साखरे, शरद उराडे, एन.पी. कुळमेथे, अक्षय राऊत, दीपक दूधबावरे आदी वनकर्मचारी करीत आहेत.

Web Title: Four accused arrested for electrocuting poachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.