सागवानासह चार आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 05:00 AM2020-07-28T05:00:00+5:302020-07-28T05:01:40+5:30
घटनास्थळ गाठून त्या ठिकाणी आढळून आलेल्या चार इसमांना वन परिक्षेत्र कार्यालय सिरोंचा येथे आणले असता त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. चौकशीसाठी त्यांना जंगलात नेले असता त्यांनी तोडलेल्या झाडांचे थुट दाखविले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : सिरोंचा-आलापल्ली मुख्य मार्गावर असलेल्या आदीमुत्तापूर गावाजवळ सिरोंचा वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या पथकाने चार सागवानी लठ्ठे व दोन दुचाकी जप्त करून चार आरोपींना अटक केली. ही कारवाई २७ जुलैच्या पहाटे आली.
इशाक बापू दुर्गम (२५), विनोद उर्फ राकेश स्वामी दुर्गम (२५), राजेंद्र बकन्ना दुर्गम (१९), संजयसिंग रामकृपालसिंग राठोड (२९) सर्व रा. सूर्यापल्ली अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सिरोंचा वन परिक्षेत्र कार्यालयाचे पथक रात्रीच्या सुमारास अमडेली जंगल परिसरात गस्त घालत होते. दरम्यान दुचाकीद्वारे सागवानी लाकडे नेली जात असल्याची गोपनिय माहिती पथकाला मिळाली. घटनास्थळ गाठून त्या ठिकाणी आढळून आलेल्या चार इसमांना वन परिक्षेत्र कार्यालय सिरोंचा येथे आणले असता त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. चौकशीसाठी त्यांना जंगलात नेले असता त्यांनी तोडलेल्या झाडांचे थुट दाखविले.
घटनास्थळावरून चार नग सागवान लठ्ठे जप्त केले. त्याची किंमत ११ हजार ८१६ रुपये एवढी होते. तसेच कुºहाड, आरी, दोन दुचाकी सुध्दा जप्त केल्या.
ही कारवाई सिरोंचाचे वन परिक्षेत्राधिकारी वि.वा. नरखेडकर, क्षेत्र सहायक बी. एम. खोब्रागडे, एल. एम. शेख, बी. एम. नरोटे, वनरक्षक आर. व्ही. जवाजी, डी. जी. भुरसे, पी. डी. कोडाप, एम. जे. धुर्वे, आर. वाय. तलांडी, एस. टी. तुलावी, आर. एस. पदा, वाय. आर. गुणशेट्टीवार यांनी केली.