दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या चौघांना अटक; दोन कारसह २ लाख १७ हजारांचा दारूसाठा जप्त

By मनोज ताजने | Published: September 21, 2022 04:53 PM2022-09-21T16:53:34+5:302022-09-21T16:54:29+5:30

एलसीबीच्या पथकाची अहेरी तालुक्यात कारवाई

Four arrested for illegally transporting liquor in Gadchiroli; Liquor stock worth 2 lakh 17 thousand seized along with two cars | दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या चौघांना अटक; दोन कारसह २ लाख १७ हजारांचा दारूसाठा जप्त

दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या चौघांना अटक; दोन कारसह २ लाख १७ हजारांचा दारूसाठा जप्त

Next

गडचिरोली : दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अनधिकृतपणे आणि चोरट्या मार्गाने दारूची आयात करणाऱ्या दोन कार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने पकडून त्यातील दारूसाठा आणि कार जप्त केल्या. या गुन्ह्यात एकूण ४ आरोपींनाही अटक करण्यात आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, एका टाटा सफारी आणि दुसऱ्या एका छोट्या कारमधून दारूचा पुरवठा केला जाणार असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. अहेरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा दारू पुरवठा केला जाणार असल्याचे कळल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गौरव गावंडे यांच्या मार्गदर्शनात पथकाने नाकेबंदी केली.

संबंधित संशयास्पद कारची तपासणी केली असता त्या दोन्ही कार मिळून २ लाख १७ हजार ६०० रुपये किमतीचे देशी-विदेशी दारूचे २४ खोके आढळले. तो सर्व मुद्देमाल आणि कार जप्त करून अहेरी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कारसोबत असलेल्या ४ आरोपींनाही अटक करण्यात आली आहे. अधिक तपास अहेरी पोलीस करीत आहेत.

Web Title: Four arrested for illegally transporting liquor in Gadchiroli; Liquor stock worth 2 lakh 17 thousand seized along with two cars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.