चार दिवसांनी होत आहे अपुरा पाणीपुरवठा

By admin | Published: May 22, 2017 01:33 AM2017-05-22T01:33:04+5:302017-05-22T01:33:04+5:30

सर्वात जास्त विहिरींचा गाव म्हणून वैरागडची ओळख आहे. या ऐतिहासीक गावात १०१ विहिरीत आहेत.

Four days of incomplete water supply | चार दिवसांनी होत आहे अपुरा पाणीपुरवठा

चार दिवसांनी होत आहे अपुरा पाणीपुरवठा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : सर्वात जास्त विहिरींचा गाव म्हणून वैरागडची ओळख आहे. या ऐतिहासीक गावात १०१ विहिरीत आहेत. कलाकुसरीने नटलेल्या आठ विहिरीत आहेत. वैलोचना व खोब्रागडी नदीच्या संगमावर गोरजाई डोह आहे. येथे मोठ्या प्रमाणात जलसाठा उपलब्ध असतानाही वैरागड गावात गेल्या अनेक दिवसांपासून पाणी संकट निर्माण झाले आहे. चार दिवसाच्या अंतराने नळ पाणी पुरवठा योजनेद्वारे गावात अल्प पाणी पुरवठा होत आहे.
वैरागड येथे ३० वर्षापूर्वीची जुनी पाणी पुरवठा योजना आहे. गावाची वाढती लोकसंख्या व पाण्याची गरज लक्षात घेऊन तीन वर्षांपूर्वी पेयजल विभागाने येथे नवीन वाढीव पाणी पुरवठा मंजूर केली. त्याचा कृती आराखडाही तयार झाला. कार्यारंभ आदेश काही दिवसात निघून नव्या पाणी योजनेचे काम सुरू होणार, अशी परिस्थिती असताना येथील विद्यमान ग्रा.पं. सदस्याने वैरागड ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या पाठणवाडा येथील पाणी पुरवठा योजनेचा नवा प्रस्ताव या योजनेला जोडण्यात आला. त्यामुळे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या उपविभागीय अभियंत्याला हा प्रस्ताव नव्याने बदलवावा लागला. परिणामी २०१७ च्या उन्हाळ्यात सुरू होणारी नळ योजना रखडली. पाठणवाडा येथे ४० ते ४५ घरांची लोकवस्ती असून पाण्यासाठी या गावात हातपंप, सौरऊर्जेवरील नळ योजना, विहीर असताना या गावासाठी वैरागडची पाणी पुरवठा योजना थांबविण्याची चूक येथील स्थानिक प्रशासनाने केली. सध्या वैरागड गावात भिषण पाणी टंचाई निर्माण झाली असून चार दिवसाच्या अंतराने नळाद्वारे अल्प पाणी पुरवठा सुरू आहे. त्यामुळे ग्रा.पं. पदाधिकाऱ्याविरोधात नागरिकांचा नाराजीचा सूर आहे. गळतीच्या पाण्यावर येथील नागरिक तहाण भागवत आहे.

नदीपात्रातील ‘तो’ खड्डा निरूपयोगी
४पाणी टंचाईवर तात्पुरती मात करण्यासाठी वैलोचना नदी पात्रात ५० हजारापेक्षा अधिक निधी खर्च करून पोकलँड मशीनच्या सहाय्याने खड्डा तयार करण्यात आला. मात्र या खड्ड्याचा पाणी पुरवठा सुविधेसाठी कोणताही उपयोग झाला नाही.
४आठ दिवसापूर्वी लोकमतने ‘नदी पात्रातील खड्डा ठरणार फार्स’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. लोकमतचे सदर वृत्त खरे ठरले आहे.

Web Title: Four days of incomplete water supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.