ग्रामस्थांकडून चार बंदुका जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 11:36 PM2017-10-08T23:36:19+5:302017-10-08T23:36:31+5:30
अहेरी तालुक्यातील देचलीपेठा उपपोलीस ठाण्यामध्ये गांधी जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी केतन मांदरे यांनी ग्रामस्थांनी शांततेचा मार्ग स्वीकारून .....
लोकमत न्यूज नेटवर्क
देचलीपेठा : अहेरी तालुक्यातील देचलीपेठा उपपोलीस ठाण्यामध्ये गांधी जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी केतन मांदरे यांनी ग्रामस्थांनी शांततेचा मार्ग स्वीकारून समाजविघातक कृती व विचारांना विरोध करावा, असे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फेरकाभट्टी येथील चार नागरिकांनी आपल्याकडील भरमार बंदुका पोलिसांकडे सुपूर्द केल्या.
यावेळी देचलीपेठा उपपोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी केतन मांजरे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. नक्षलचळवळीचा निषेध करून आता नक्षलवाद्यांना कदापी मदत करणार नाही, असे आश्वासन बंदुका सुपूर्द केलेल्या नागरिकांनी पोलिसांना दिले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.