चार लाखांचा मुद्देमाल पकडला
By admin | Published: January 11, 2017 02:11 AM2017-01-11T02:11:58+5:302017-01-11T02:11:58+5:30
गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक विजय पुराणीक यांनी
रानमुलात कारवाई : मोहफूल दारू व सडवा जप्त
गडचिरोली : गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक विजय पुराणीक यांनी आपल्या सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांसह रानमूल शेतशिवार, पोटफोडी नदीच्या पात्रात सोमवारी धाड टाकून येथून मोहफुलाच्या दारू, सडव्यासह एकूण ३ लाख ९६ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी सुदर्शन उईके, रमेश पेंदाम, निकेश गावडे व भगवान मडावी सर्व रा. रानमूल या आरोपींना अटक करण्यात आली. या सर्व आरोपींना न्यायालयाने १३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. सदर कारवाई गडचिरोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक विजय पुराणिक, पोलीस उपनिरिक्षक सत्यवाण भूयारकर, सीरसाठ, महिला पोलीस उपनिरिक्षक नैताम, सहायक फौजदार सोमेश्वर रोहणकर, अमृत राठोड, पोलीस हवालदार कुंदा कुळमेथे, धरणी, जनबंधू, डांगे, रोहणकर, राजेश चिमनकर, विजय राऊत, हरिदास राऊत आदींनी केली. पोलिसांनी मोहफूल सडव्याचे ९६ नग व ४५ लिटर हातभट्टीची मोहफूल दारू येथून जप्त केली. या प्रकरणातील इतर आरोपी फरार असून पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक भूयारकर करीत आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)