चार लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:27 AM2021-06-02T04:27:45+5:302021-06-02T04:27:45+5:30
कूरखेडा पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या गोठणगाव टी-पाॅइंटमार्गे आरमोरी व गडचिरोलीकडे सुगंधित तंबाखूची तस्करी करण्यात येते. या माहितीवरून उपविभागीय पोलीस अधिकारी ...
कूरखेडा पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या गोठणगाव टी-पाॅइंटमार्गे आरमोरी व गडचिरोलीकडे सुगंधित तंबाखूची तस्करी करण्यात येते. या माहितीवरून उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भंवर यांचा मार्गदर्शनात ठाणेदार सुधाकर देडे, पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे, महिला पोलीस उपनिरीक्षक शीतल माने व पोलीस चमूने या मार्गावर पाळत ठेवली होती. यावेळी कोरचीकडून एक पांढऱ्या रंगाचे चारचाकी वाहन क्र. एम एच ३३ ए ५४४० संशयास्पदरीत्या येताना दिसून आले. वाहनाला थांबवत झडती घेतली असता तिथे शासनाने प्रतिबंधित केलेला तंबाखूचा मोठा साठा आढळून आला. तंबाखू व कार जप्त करण्यात आली आहे. आरोपी विनयकुमार आबासाहेब जुआरे व यज्ञा विनयकुमार जुआरे, दोघेही रा. आरमोरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
===Photopath===
010621\img-20210601-wa0025.jpg
===Caption===
फोटो जप्त करण्यात आलेल्या सूगंधीत तंबाकू व वाहनासह कूरखेडा पोलीस चमू