सुपारीसह चार लाखांचा तंबाखूसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 05:00 AM2020-04-30T05:00:00+5:302020-04-30T05:00:34+5:30

रवीकुमार डेंगानी यांच्या गोदाममधून तीन ट्रॅक्टर प्लास्टिक साहित्य जप्त करण्यात आले. याची किंमत १ लाख २० हजार रुपये आहे. त्यांच्याकडून २५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. लक्ष्मी प्रोव्हीजनमधून सुगंधित तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ व खर्रापन्नी जप्त करून त्यांच्यावर ५० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. अब्जल ट्रेडर्समधून १५ हजार रुपयांचे तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले.

Four lakh worth of tobacco including betel nut seized | सुपारीसह चार लाखांचा तंबाखूसाठा जप्त

सुपारीसह चार लाखांचा तंबाखूसाठा जप्त

googlenewsNext
ठळक मुद्देएक लाखाचा दंड वसूल : मुक्तिपथ व प्रशासनाची वडसाच्या बाजारपेठेत धडक कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : नगर परिषद, पोलीस, महसूल प्रशासन व मुक्तिपथच्या संयुक्त विद्यमाने देसाईगंजच्या मुख्य बाजारपेठेत बुधवारी धाड टाकून पाच दुकानातून अवैध सुपारीसह सुगंधित तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचा ४ लाख ३७ हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. या धडक कारवाईमुळे शहरातील तंबाखू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर पावले उचलली आहेत. यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्याचे प्रमुख कारण खर्रा खाऊन थुंकण्याचे असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रशासनाने तंबाखू विरोधात मोहीम हाती घेतली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार, नगर परिषद, पोलीस, महसूल प्रशासनाच्या वतीने बुधवारी शहरातील सन्नी कन्फेक्शनरी दुकानात धाड टाकण्यात आली. या दुकानातून अडीच लाख रुपये किमतीची ३० पोती सुपारी जप्त करण्यात आली. तसेच दुकान मालकाकडून पाच हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
रवीकुमार डेंगानी यांच्या गोदाममधून तीन ट्रॅक्टर प्लास्टिक साहित्य जप्त करण्यात आले. याची किंमत १ लाख २० हजार रुपये आहे. त्यांच्याकडून २५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. लक्ष्मी प्रोव्हीजनमधून सुगंधित तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ व खर्रापन्नी जप्त करून त्यांच्यावर ५० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. अब्जल ट्रेडर्समधून १५ हजार रुपयांचे तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले. त्यांच्यावर पाच हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. इंद्रकुमार नागदेवे यांच्या दुकानातून दोन हजार रुपयांचा तंबाखू, बीडी, सिगारेट आदी साहित्य जप्त करण्यात आले.
सदर कारवाई तहसीलदार डी.जी.सोनवाने, नायब तहसीलदार दीपक गुट्टे, पालिकेचे मुख्याधिकारी डॉ.कुलभूषण रामटेके, मुक्तिपथचे जिल्हा संचालक डॉ.मयूर गुप्ता, तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक डॉ.नंदू मेश्राम आदींनी केली.
 

Web Title: Four lakh worth of tobacco including betel nut seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.