मृतांच्या कुटुंबीयांना चार लाखांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 12:48 AM2018-07-04T00:48:05+5:302018-07-04T00:50:35+5:30
कपडे धुताना पामुलगौतम नदीत बुडून मृत्यू पावलेल्या तीन महिलांच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाख रूपयांची मदत भामरागडचे तहसीलदार कैलास अंडील यांच्या हस्ते देण्यात आली.
Next
लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : कपडे धुताना पामुलगौतम नदीत बुडून मृत्यू पावलेल्या तीन महिलांच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाख रूपयांची मदत भामरागडचे तहसीलदार कैलास अंडील यांच्या हस्ते देण्यात आली.
हिदूर येथील चार महिला कपडे धुण्यासाठी पामुलगौतम नदीवर गेल्या होत्या. नदीचा अचानक प्रवाह वाढल्याने सौमी कोरीया दुर्वा, जानकी बिरजू तिम्मा व चंदा रामजी गोटा या तीन महिलांचा बुडून मृत्यू झाला. एक मुलगी कशीबशी बाहेर निघाली. भामरागडच्या तहसीलदारांनी तत्काळ सानुग्रह राशी मंजूर केली. हिदूर या गावी जाऊन तहसीलदारांनी तिन्ही कुटुंब प्रमुखांना प्रत्येकी चार लाख रूपयांचा धनादेश दिला.